शॉर्टसर्किटमुळे गहू पिकाला आग
By Admin | Updated: March 12, 2017 01:54 IST2017-03-12T01:54:19+5:302017-03-12T01:54:19+5:30
वीज वाहिनीवर शॉर्टसर्किट; ४५ हजार रुपयाचे नुकसान झाले.

शॉर्टसर्किटमुळे गहू पिकाला आग
हराळ(जि. वाशिम), दि. ११- येथील शेतकरी विजय श्रीराम सरकटे यांच्या शेतामधील चार एकर पेरलेला गहू डी.पी.वरील वीज वाहिनीवर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला. यात त्यांचे सुमारे ४५ हजार रुपयाचे नुकसान झाले. १0 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागून शेतामधील गव्हाच्या पेंढय़ा आगिच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. घटनेचा पंचनामा येथील तलाठी मुठाळ यांनी केला. याप्रकरणी रिसोड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली असून, वीज वितरण विभागाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी सरकटे यांनी केली आहे.