व्यापारी काय म्हणतात? (पितृपंधरवड्यात भोपळा खातोय भाव)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST2021-09-24T04:48:17+5:302021-09-24T04:48:17+5:30
कोट : पितृ पंधरवडा सुरू असल्याने भाज्यांची मागणी काही प्रमाणात वाढली आहे. प्रामुख्याने गवार, दोडके, भाेपळा आणि कारल्यांना मागणी ...

व्यापारी काय म्हणतात? (पितृपंधरवड्यात भोपळा खातोय भाव)
कोट : पितृ पंधरवडा सुरू असल्याने भाज्यांची मागणी काही प्रमाणात वाढली आहे. प्रामुख्याने गवार, दोडके, भाेपळा आणि कारल्यांना मागणी आहे. पावसामुळे भाजीपाल्यावर परिणाम झाल्याने मागणीनुसार पुरवठा करणे कठीण होत आहे.
- आकाश भगरे
०००००००००००००००००००
२) कोट : पितृ पंधरवड्यातील जेवणावळीच्या प्रथेमुळे भाजीपाल्याला मागणी वाढत असली तरी यंदा फारशी मागणी नाही. भोपळा, कारली, गवार आदींच्या मागणीत थोडी अधिक वाढ असून, मागणीच्या तुलनेत बाजारात भाजीपाल्याचा अपेक्षित पुरवठा करण्याची कसरत सुरू आहे.
- दत्तात्रय राऊत
भाजी विक्रेता
०००००००००००००००००००
४) अर्धा-एक किलोसाठी बाजारात कोण जाणार?
कोट : पितृ पंधरवड्यातील प्रथा परंपरेनुसार घरी जेवणावळी कराव्या लागणार आहेेत. त्यासाठी फारसा भाजीपाला लागत नाही. किलो, दोन किलो भाजीसाठी बाजारात जाण्याऐवजी दारावर खरेदी करणे योग्य वाटते. दारावर येणारे विक्रेते मात्र त्याचा फायदा घेऊन चढ्या दराने विक्री करतात.
- सरस्वतीबाई कोळकर
०००००००००००००००००००
कोट : बाजाराच्या तुलनेत दारावर विक्रीसाठी येणारे भाजी विक्रेते अधिक दराने भाज्यांची विक्री करतात, परंतु जेवणावळीसाठी लागणाऱ्या भाजीपाल्याचे प्रमाण पाहता बाजारात भाजी खरेदीसाठी जाणेही परवडणारे नाही. त्यामुळे दारावरच भाजीपाल्याची खरेदी करत आहोत.
- रेखाबाई खैरे
००००००००००००००००००००