काेराेनाने मृत्यू झालेल्या एक अपत्य असलेल्या पालकांचे काय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST2021-06-05T04:28:44+5:302021-06-05T04:28:44+5:30
आई व वडिलांचा मृत्यू झालेल्या बालकांचे संगाेपन व्हावे याकरिता हा निर्णय चांगलाच; परंतु ज्यांना एकच अपत्य हाेते व त्याचाही ...

काेराेनाने मृत्यू झालेल्या एक अपत्य असलेल्या पालकांचे काय
आई व वडिलांचा मृत्यू झालेल्या बालकांचे संगाेपन व्हावे याकरिता हा निर्णय चांगलाच; परंतु ज्यांना एकच अपत्य हाेते व त्याचाही मृत्यू झाला अशा पालकांनी काय करावे, असा प्रश्न निर्माण हाेत आहे. काेराेनामुळे लहान बालकांचे मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी १३ ते २५ वर्षीय वयाेगटातील अनेक मुलामुलींचा मृत्यू झाल्याची नाेंद आराेग्य विभागाच्या दप्तरी आहे. यामध्ये काही मुले अशीही आहेत जे आपल्या पालकांचे एकमेव अपत्य हाेते. यांच्याच्या भरवशावर यांचे म्हातारपणातील भवितव्य अवलंबून हाेते. आता तेही गेल्याने या पालकांनी काय करावे.
..................
शासनाने लक्ष देणे गरजेचे
ज्याप्रमाणे कोरोनामुळे आई-वडील दोघांचाही मृत्यू झाला असल्यास त्यांच्या पाल्याला मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्याचप्रमाणे एक अपत्य असलेल्या ५० ते ५५ वर्षांवरील पालकांनाही मदत जाहीर करण्याबाबत शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. कारण या व्यक्तीचे पालनपाेषण पुढे काेणी करावे, हा माेठा प्रश्न आहे.
...................
अशा पालकांना दरमहा अर्थसाह्याची गरज
कुटुंबातील कर्त्यापुरुषाचा मृत्यू झाला असेल आणि घरची आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर शासनाच्या बालसंगोपन योजनेंतर्गत ११०० रुपये दरमहा अर्थसाह्य केले जाणार आहे. त्याचप्रमाणे एकच अपत्य असलेल्या पालकांनाही दरमहा अर्थसाह्याचे नियाेजन करण्याची गरज आहे.
...........................
एकमेव अपत्य गेलेल्यांना जीवन जगण्याची चिंता
वाशिम शहरातील एका व्यक्तीला एकच अपत्य होते. त्यालाही काेराेनाने हिरावल्याने पुढील जीवन कसे जगावे, अशी चिंता त्यांच्यासमाेर निर्माण झाली आहे. वयही खूप असल्याने अपत्य हाेईल किंवा नाही सांगता येत नसल्याने त्या व्यक्तीसमाेर माेठा पेच निर्माण झाला आहे. अशा व्यक्तींचा शाेध घेऊन शासनाने त्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे.
...........................