धनज परिसरातील विहिरी तुंडूबच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:11 IST2021-01-08T06:11:27+5:302021-01-08T06:11:27+5:30
------------- दापुरा परिसरात गुरांची तपासणी दापुरा: हिवाळ्याला सुरुवात झाली असताना आता वातावरणात बदल झाल्याने गुरांना विविध आजारांची लागण ...

धनज परिसरातील विहिरी तुंडूबच
-------------
दापुरा परिसरात गुरांची तपासणी
दापुरा: हिवाळ्याला सुरुवात झाली असताना आता वातावरणात बदल झाल्याने गुरांना विविध आजारांची लागण होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाकडून गुरांची तपासणी केली जात आहे. या आठवड्यात दापुरा परिसरात ही मोहीम राबविण्यात येणार असून, आजारी गुरांवर लसीकरणही करण्यात येणार असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.
-------------------
पोहा परिसरात शेतकºयांना मार्गदर्शन
पोहरादेवी: कारंजा तालुका कृषी विभागाच्यावतीने रब्बी पिकांवरील फवारणीसंदर्भात शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. या अंतर्गत पोहा परिसरातील काही गावांत कृषी सहाय्यकांनी शेतकºयांना मार्गदर्शन करून किटकनाशक फवारणीपूर्वी खबरदारी घेण्याचे आवाहन केले. यावेळी गहू, हरभरा पिकांची पाहणी करून किड नियंत्रणाबाबत शेतकºयांना मार्गदर्शनही करण्यात आले.
-----------------
समृद्धीच्या कामामुळे रस्त्याची दैना
उंबर्डा बाजार: समृद्धी महामार्गाच्या कामासाठी गौणखनिजाची वाहतूक करणारी जडवाहने सतत धावत असल्याने उंबर्डाबाजार ते झोडगा या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. तथापि, या रस्त्याच्या दुरावस्थेकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे उंबर्डाबाजार ते झोडगा या रस्त्यावर वाहने चालविताना चालकांची मोठी कसरत पाहायला मिळत आहे.
---------
आरोग्य केंद्रातील ११ पदे रिक्त
आसेगाव: मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव आरोग्यवर्धिनी केंद्रातंर्गत गेल्या वर्षभरापासून ११ पदे रिक्त आहेत. त्यात २ अधिकारी आणि १५ कर्मचारी या आरोग्य केंद्रांतर्गत येणाºया गावांतील ग्रामस्थांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळत आहेत. तब्बल ३० हजार ग्रामस्थांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या या आरोग्य केंद्रातील पदे भरण्याची मागणी होत आहे.