पंजाब ते नांदेड प्रवास करणाऱ्या सायकलस्वारांचे वाशिम येथे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 17:53 IST2018-02-20T17:51:06+5:302018-02-20T17:53:11+5:30
वाशिम - पंजाब राज्यातील लुधियाना येथून मराठवाड्यातील नांदेड येथे गुरु गोविंदसिंग समाधीच्या दर्शनासाठी सायकलने जाणाऱ्या सायकलस्वारांचे वाशिम नगरीत १९ फेब्रुवारीला सायंकाळी आगमन झाले.

पंजाब ते नांदेड प्रवास करणाऱ्या सायकलस्वारांचे वाशिम येथे स्वागत
वाशिम - पंजाब राज्यातील लुधियाना येथून मराठवाड्यातील नांदेड येथे गुरु गोविंदसिंग समाधीच्या दर्शनासाठी सायकलने जाणाऱ्या सायकलस्वारांचे वाशिम नगरीत १९ फेब्रुवारीला सायंकाळी आगमन झाले. यावेळी मारवाडी युवा मंचच्यावतीने या सर्व सायकलस्वारांचे स्वागत करण्यात आले.
पंजाब राज्यातील लुधियाना येथील १२ सायकलस्वार ५ फेबु्रवारी रोजी नांदेडसाठी रवाना झाले होते. हे १२ सायकलस्वार सोमवार १९ फेबु्रवारी रोजी सायंकाळी वाशिम शहरात दाखल होत असल्याची माहिती नारायण व्यास यांना मिळाल्यानंतर त्यांनी या सायकलस्वारांचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला आणि याबाबत त्यांनी मारवाडी युवा मंचच्या पदाधिकाºयांना याबाबत माहिती दिली. मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष मनिष मंत्री यांनी सायकल स्वार ग्रुपचे श्रीनिवास व्यास, चेतन शर्मा, आदेश कहाते, दिपक एकाडे, पवन शर्मा, इत्यादी पदाधिकाºयांच्या समवेत पंजाब येथून नांदेडकडे प्रस्थान करणाºया सर्व सायकल स्वारांचे स्वागत केले.