शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

भारनियमन : शिवसेनेचे जिल्हाभर धरणे! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 1:19 AM

वाशिम : वीज भारनियमन, नादुरूस्त रोहित्र यांसह महावितरणशी संबंधित व अन्य विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिवसेनेच्यावतीने बुधवारी जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले. एका महिन्याच्या आत समस्या निकाली काढा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आला.

ठळक मुद्देजनता त्रस्त एका महिन्याचा अल्टिमेटम!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वीज भारनियमन, नादुरूस्त रोहित्र यांसह महावितरणशी संबंधित व अन्य विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिवसेनेच्यावतीने बुधवारी जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले. एका महिन्याच्या आत समस्या निकाली काढा अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आला.वीज भारनियमनात अचानक वाढ झाल्याने शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. शेतातील विद्युत रोहित्रात बिघाड होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. शेकडो विद्युत रोहित्र नादुरूस्त असल्याने शेतकर्‍यांसमोर रब्बी हंगामातील सिंचनाचा पेच निर्माण झाला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही कृषी पंप जोडणीचा प्रश्न निकाली निघाला नाही. या पृष्ठभूमीवर शिवसेनेच्यावतीने २0 सप्टेंबर रोजी जिल्हाभरात धरणे आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विदर्भ संपर्क प्रमुख दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार तसेच खासदार भावना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम येथे महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर  तालुका प्रमुख रामदास मते पाटील यांच्या नेतृत्वात बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले. वाढलेले भारनियमन बंद करावे, रोहित्र त्वरित दुरुस्ती करणे, शेतकर्‍यांच्या मागणीनुसार त्यांना रोहित्र तातडीने उपलब्ध करून देणे, कृषी पंपाची प्रलंबित वीज जोडणी त्वरित देणे यांसह विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देत चर्चा केली. चर्चेदरम्यान भारनियमनाच्या प्रश्नासह शेतकर्‍यांच्या विविध समस्यांचा येत्या एक महिन्यात निपटारा करण्यात येईल, असे आश्‍वासन अधीक्षक अभियंत्यांनी दिले. या आंदोलनामध्ये माजी जिल्हाप्रमुख डॉ. सुधीर कवर, उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, तालुकाप्रमुख रामदास मते पाटील, शहरप्रमुख गजानन भांदुर्गे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगला सरनाईक यांच्यासह असंख्य शिवसैनिक व शेतकर्‍यांनी सहभाग घेतला. मालेगाव येथे तालुका व शहर शिवसेनेतर्फे विविध मागण्यांसंदर्भात धरणे देऊन तहसीलदार आणि वीज वितरणच्या अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. तुरीचे चुकारे देण्यात यावे, सोयाबीन अनुदान द्यावे, पेट्रोल व डिझलचे गगनाला भिडलेले भाव कमी करावे, भारनियमन कमी करावे,  कर्जमाफीच्या अर्जाला मुदतवाढ द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या. मालेगावचे महावितरणचे मुख्य अभियंता पांडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवसेना शहराध्य्क्ष संतोष जोशी, जिल्हा परिषद कृषी सभापती विश्‍वनाथ सानप यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिसोड येथे शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले.  भारनियमन कमी करावे, नादुरुस्त रोहित्रांची दुरुस्ती तसेच नवीन रोहित्र उपलब्ध करावे, सोयाबीनचे अनुदान व तुरीचे चुकारे द्यावे, खरीप पिकांचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्यावी, रिसोड तालुक्यात पैनगंगा नदीवर बॅरेजेस मंजूर करावे, पेट्रोल व डिझलची दरवाड कमी करावी, अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य कराव्या, मीटर रिडींग, बिल वाटप व अंगणवाडीच्या मुलांना आहार वाटपाचे काम महिला बचत गटांना द्यावे, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महादेव ठाकरे, उपजिल्हाप्रमुख डॉ. अरूण देशमुख, निवासी उपजिल्हाप्रमुख भागवत गवळी, शहर प्रमुख अरूण मगर, संध्या सरनाईक, अँड. गजानन अवताडे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती.याप्रमाणेच कारंजा, मंगरूळपीर, मानोरा येथेदेखील विविध मागण्यांसंदर्भात शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले.