मंगरुळपीर तालुक्यातील गावांत श्रमदानाची लाट ; मुलाबाळांसोबत महिलांचे श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 15:01 IST2018-04-28T15:01:31+5:302018-04-28T15:01:31+5:30
वाशिम: पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या मंगरुळपीर तालुक्यातील गावांत श्रमदानाची लाट उसळली असून, जलसंधारणाच्या कामांसाठी श्रमदान करण्यात महिला आघाडीवर आहेत.

मंगरुळपीर तालुक्यातील गावांत श्रमदानाची लाट ; मुलाबाळांसोबत महिलांचे श्रमदान
वाशिम: पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या मंगरुळपीर तालुक्यातील गावांत श्रमदानाची लाट उसळली असून, जलसंधारणाच्या कामांसाठी श्रमदान करण्यात महिला आघाडीवर आहेत. अगदी लहान मुलांना सोबत घेऊन महिला गावागावात जलसंधारणाची कामे करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील ५९ गावांनी वॉटर कप स्पर्धा ३ मध्ये सहभाग घेतला असून, यामधील ३० गावांतील ग्रामस्थांनी पाणीटंचाईवर कायम मात करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी सकाळपासूनच ग्रामस्थ टोपले, कुदाळ फावडे घेऊन श्रमदानासाठी निघत आहेत. तालुक्यातील पारवा, सायखेडा, शेंदूरजना, लखमापूर, बोरव्हा, पिंपळखुटा आदि गावांत तर महिला मंडळी श्रमदानात आघाडीवर असून, या गावांत लहान मुलांना सोबत घेऊन महिला श्रमदान करीत आहेत. वृद्ध महिला नातवांना सोबत घेऊन त्यांना खेळवतानाच श्रमदानही करीत आहेत. तर काही महिला स्वत:च्या चिमुकल्यांनासोबत फिरवत श्रमदान करीत असल्याचे चित्र मंगरुळपीर तालुक्यातील पिंपळखुटा येथे पाहायला मिळत आहे. या महिला सीसीटी, बांधबदिस्तीच्या कामांत खोदकाम करून माती बाजूला करण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे कामांचे प्रमाण वाढले आहे. पारवा गटग्रामपंचायत अंतर्गत येणाºया पारवासह बोरव्हा आणि लखमापूर येथेही श्रमदानाची लाट उसळली असून, महिला, पुरुषांसह बालक मंडळीही श्रमदानासाठी झटत आहे. ग्रामस्थांच्या या प्रयत्नांमुळे तिन्ही गावांत मिळून जवळपास २ हजार घनमीटरपेक्षा अधिक कामे झाली आहेत. काही ठिकाणी शेततळ्याच्या कामासाठीही ग्रामस्थ उत्साही असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.