मेहा येथील टरबूज बागा फुलल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:40 IST2021-02-13T04:40:08+5:302021-02-13T04:40:08+5:30

डिसेंबर महिन्याच्या अखेरीस लागवड करण्यात आलेल्या टरबूज वेलांनी सद्या संपूर्ण टरबूज बाग भरून गेली आहे. तसेच फळ सुद्धा मोठ्या ...

Watermelon orchards in Meha bloom | मेहा येथील टरबूज बागा फुलल्यात

मेहा येथील टरबूज बागा फुलल्यात

डिसेंबर महिन्याच्या अखेरीस लागवड करण्यात आलेल्या टरबूज वेलांनी सद्या संपूर्ण टरबूज बाग भरून गेली आहे. तसेच फळ सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहे.सद्या सरासरी एका टरबुजाचे वजन हे दोन ते अडीच किलो आहे. जेव्हा टरबुजाची पूर्ण वाढ होते तेव्हा एका टरबुजचे वजन हे पाच ते सहा किलो एवढे होते.तीन महिन्यात हे फळ पूर्णपणे खाण्यायोग्य तयार होते. धनज परिसरात मेहा येथे सर्वाधिक ७० एकर एवढ्या क्षेत्रावर टरबुजची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या क्षेत्रात लागवड करण्यात आलेल्या टरबुजाला व्यापाऱ्यांकडून अपेक्षित भाव मिळावा अशी अपेक्षा मेहा येथील शेतकरी करीत आहे.

माझा शेतात २ एकर एवढ्यात क्षेत्रात मी टरबूजची लागवड केली आहे .सध्या पिकाची परिस्थिती उत्तम आहे. फळाला अपेक्षित बाजारभाव मिळावा हीच अपेक्षा आहे.

सूरज निचळ

युवा शेतकरी , मेहा.

Web Title: Watermelon orchards in Meha bloom