शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी स्वखर्चाने खोदल्या कुपनलिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 2:31 PM

पाण्यासाठी वणवण भटकणाºया ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी गावातील १० सद्गृहस्थांनी पुढाकार घेतला आहे.

- गोपाल माचलकर पार्डी ताड: वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. जलस्वराजची पाणी पुरवठा योजना बंद पडली आहेत. त्यातच  विहिरी, हातपंप हिवाळ्यातच कोरडे पडले असून, ग्रामपंचायतची कुठली पर्यायी व्यवस्था नाही. अशात पाण्यासाठी वणवण भटकणाºया ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी गावातील १० सद्गृहस्थांनी पुढाकार घेतला आहे. स्वत:च्या परिवारासह ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने कूपनलिका खोदल्या आहेत.मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड हे  २८०० लोकसंख्येचे गाव असून, गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती किंवा शेतमजुरीच आहे. या ठिकाणी विविध धर्माच्या लोकांचे वास्तव्य आहे. कधीकाळी परिसरातील नद्यांना असलेल्या पाण्यामुळे येथे पाणीटंचाई जाणवत नव्हती; परंतु नद्या, नाले बुजत गेल्याने जमिनीतील पाण्याचा निचरा कमी झाला आणि हळहळू गावातील भुजल पातळी खालावत गेली. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून प्रत्येक उन्हाळ्यात येथे पाणीटंचाईची समस्या उद्भवत आहे. यंदा ही समस्या अधिकच तीव्र झाली. गावातील विहिरी कोरड्या पडल्या, तर हातपंप एक वर्षापासून बंद आहेत. त्यातच गावातील जलस्वराज योजनेची विहीर हिवाळ्यातच कोरडी पडली आणि पर्यायी व्यवस्था नसल्याने येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले. गावकरी शेतशिवारात वणवण करीत पाणी आणू लागले. त्यामुळे शेतमजुरांच्या रोजगारावरही परिणाम होऊ लागला. अशात गावातील ग्रा.पं. सदस्य धर्मराज बिडकर, माजी उपसरपंच बाळू लांभाडे, विठ्ठल गायकवाड, किशोर बाभुळे, कैलास गावंडे, दिपक ठाकरे, गजानन डाळ, रामा पानभरे, गजानन वैद्य आणि शांताराम आडोळकर यांनी स्वखर्चाने कूपनलिका खोदत स्वत:च्या परिवाराची तहान भागवितानाच गावकºयांना मोफत पाणी पुरवठा करणे सुरू केले. त्यांच्या या उपक्रमाचा गावकºयांना मोठा आधार झाला आहे. पाणीटंचाई उपाय योजनांचे प्रस्ताव प्रलंबितचगावात निर्माण झालेली भीषण पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतच्यावतीने सरपंचांनी पंचायत समितीमार्फत तहसील कार्यालयाकडे टँकरने पाणी पुरवठा करण्यासह विहिर अधिग्रहीत करण्याचा प्रस्तावही पाठविला; परंतु महिना उलटला तरी, त्यातील एकाही प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे गावातील पाणीटंचाईची समस्या कायमच असून, आता केवळ गावातील सद्गृहस्थांचा उपक्रमच तहान भागविण्यास आधार ठरत आहे.

जलस्वराज योजनेची विहिर कोरडी पडली आहे. त्यातच गावातील इतर विहिरी आणि हातपंपांनाही पाणी नाही. त्यामुळे पंचायत समितीकडे विहिर  अधिग्रहणासह टँकरचा प्रस्ताव पाठविला आहे; परंतु अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. -विजय लांभाडे सरपंच, पार्डी ताड

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी