शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

पाणीटंचाईमुळे मानोरा तालुक्यात हाहाकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 15:26 IST

मानोरा ( वाशिम )  : तालुक्याला भीषण पाणी टंचाईने ग्रासले आहे. घोटभर पाण्यासाठी महिलांची दिवस, रात्र भटकंती होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा ( वाशिम )  : तालुक्याला भीषण पाणी टंचाईने ग्रासले आहे. घोटभर पाण्यासाठी महिलांची दिवस, रात्र भटकंती होत आहे. पाणी टंचाई निवारणासाठी अनेक ग्रामपंचायतींनी शासनाकडे दोन ते तीन महिन्यापासून प्रस्ताव पाठविले आहेत; परंतु त्यापैकी एकाही प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यावाचून होरपळ होत असल्याचे दिसत आहे. मानोरा तालुक्यात पाणी टंचाईने उग्र रुप धारण केले असून, ६६ गावांना पाणी टंचाईचे चटके जाणवत आहेत. पाण्यासाठी भर उन्हात महिला दिवसरात्र वणवण करीत आहेत. त्यातच उज्वलनगर, पाळोदी, परिसरात अतिशय तीव्र पाणी टंचाई जानवत आहे. घोटभर पाण्यासाठी विहीरीवर महिलांची झुंबड पहावयास मिळत आहे. पाळोदीचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी मोठी आंदोलन करण्यात आली होती, टँकरने पाणी पुरवठा करावा यासाठी गलमगाव आणि पाळोदी ग्रामपंचायतने दोन ते तीन महिन्यांपूर्वी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला परंतु अद्यापही टँकरचा पाणी प्रश्न मार्गी लागला नाही. पाणीटंचाई निवारणाबाबत प्रशासन उदासीन असल्याने देऊरवाडी ग्रामपंचायतने २९ एप्रिल रोजी तातडीने सभा घेऊन पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊन अघटित प्रकार घडल्यास प्रशासन जबाबदार अशा ठराव घेतला. त्याशिवाय सावरगाव फारेस्ट,  धानोरा बु, हातोली, वडगाव, शेंदोना तांडा, शेंदोना , पोहरादेवी, बालाजीनगर, वसंतनगर, आसोला बु, गोस्तासह अनेक गावात पाणी टंचाई जानवत आहे. दरम्यान, मानोरा पंचायत समितीने ६६ गावासाठी विहीर अधिग्रहण व ५ गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी तहसीलस्तरावर प्रस्ताव पाठवले, परंतु अद्याप यातील एकाही प्रस्तावाला मंजुर मिळाली नाही.  दुषित पाण्यामुळे गलमगावात अतिसाराची लागण

मानोरा तालुक्यातील ग्रामीण भागांत पाणीटंचाईने रुद्र रुप धारण केले आहे. गलमगावातही ही स्थिती असून, पर्यायी योजना नसल्याने ग्रामस्थ हातपंपांचे पाणी पिण्यासाठी वापरत आहेत. भुजल पातळी खोल गेल्याने हातपंपांचे पाणी दुषित झाले आहे. त्यामुळे येथील अनेक ग्रामस्थांना अतिसाराची लागण झाली आहे. यावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाचे पथकही गलमगाव येथे दाखल झाले असून, त्यांनी जलस्त्रोतातील पाण्याची तपासणी केली. त्यानुसार ग्रामपंचायत प्रशासनाला गावातील हातपंप बंद करण्याच्या सुचनाही दिल्या आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने टँकरने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाईManoraमानोरा