पाणीपुरवठयाचे ‘व्हॉल्व’ अस्वच्छतेत
By Admin | Updated: July 24, 2014 23:01 IST2014-07-24T23:01:01+5:302014-07-24T23:01:01+5:30
पाणीपुरवठा योजनेचे व्हॉल्व चक्क घाणपाण्यात अडकले असल्याचे वास्तव आहे.

पाणीपुरवठयाचे ‘व्हॉल्व’ अस्वच्छतेत
शिरपूरजैन : येथील सरपंचांचा वार्ड असलेल्या तीनमध्ये पाणीपुरवठा योजनेचे व्हॉल्व चक्क घाणपाण्यात अडकले असल्याचे वास्तव आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य यंत्रणा अजूनही सुस्तच असल्याचे दिसून येत आहे.
शिरपूर गावाचे पुरातन नाव सिध्दपुर असून सध्या गावात असणार्या विविध समस्यामुळे या गावाला उपहासाने ह्यसमस्यापुरह्ण म्हटले जात आहे. येथील ग्राम पंचायतच्या नळयोजनेव्दारे गावाला पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या गावात ४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. गावाला पाणीपुरवठा करणार्यासाठी ग्राम पंचायतने गावामध्ये १0 ते १२ ठिकाणी व्हॉल्व बसविले आहेत. त्यापैकी सरपंच स्वत: निवडून आलेल्या वार्ड क्रमांक तीनमधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशव्दारासमोरील व्हॉल्व हा घाणीच्या विळख्यात अडकला आहे. या व्हॉल्वच्या खड्यात घाणयुक्त चिखल असतो. घाणीत अडकलेल्या या व्हॉल्वमधूनच नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच याच वार्डात संतोष भालेराव यांच्या चहाच्या दुकानासमोरही व्हॉल्वच्या खड्यात प्रचंड घाण पाणी साचत असते. तेथे डुकरांचा दिवसभर मुक्त वावर असतो. आरोग्य विभाग गावातील पाणी नमुने तपासून, पाणी पिण्यास योग्य की अयोग्य याबाबतचा अहवाल देत असते. शिरपूर येथील पाणीपुरवठय़ाचे व्हाल्वच घाण पाण्यात असल्याने वार्ड तीनमधील पाणी पिण्यास योग्य की अयोग्य? असा अहवाल आजपर्यंतही आरोग्य विभागाने दिला नाही. जिल्हयात पेशी कमी होणार्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती वाशिम येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी शिरपूर येथील खासगी डॉक्टरांना यापूर्वी दिली असल्याचे एका डॉक्टरांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे.