पानझिरा, अनई येथे जलसंधारणाची कामे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 13:54 IST2019-01-16T13:53:31+5:302019-01-16T13:54:43+5:30
कारंजा लाड : सुजलाम सुजलाम वाशिम जिल्हा अभियानांतर्गत कारंजा तालुक्यात रामनगर, काकडशिवणी, गंगापूर, कामरगाव व महागाव या गावांत ढाळीचे बांध बंधिस्तीची कामे युद्धस्तरावर असून, आता पानझिरा आणि अनई येथेही जलसंधारणाची विविध कामे सुरू झाली आहेत.

पानझिरा, अनई येथे जलसंधारणाची कामे !
सुजलाम,सुफलाम अभियान : अधिकाºयांकडून कामांची पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : सुजलाम सुजलाम वाशिम जिल्हा अभियानांतर्गत कारंजा तालुक्यात रामनगर, काकडशिवणी, गंगापूर, कामरगाव व महागाव या गावांत ढाळीचे बांध बंधिस्तीची कामे युद्धस्तरावर असून, आता पानझिरा आणि अनई येथेही जलसंधारणाची विविध कामे सुरू झाली आहेत.
पानझिरा येथे जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातर्फे नाला खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या नाला खोलीकरण कामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभाग तसेच मृद व जलसंधारण विभागाचे कारंजा शाखा अभियंता अब्दुल सईद, किन्ही ग्राम पंचायतचे सरंपच रत्नाबाई कवळे, लक्ष्मण कवळे, ग्राम पंचायत सदस्य संतोष राउत, श्याम राउत, सुजलाम सुफलाम अभियानाचे तालुका समन्वयक अक्षय सेलसुलकर, बीजेएसचे प्रफुल बानगांवकर यांची उपस्थिती होती. मृद व जलसंधारण विभागाकडून अनई येथे जलसंधारणाची कामे सुरू आहे. या कामाची पाहणी मृद व जलंसधारण विभागाचे कारंजा शाखा अभियंता अब्दुल सईद यांच्याकडून बुधवारी करण्यात आली. योवळी पोकलन मशिनचे मालक महेश बोरीकर यांना कामाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी सरंपच संकेत नाखले व भारतीय जैन संघटनेची चमू उपस्थित होती. कारंजा तालुक्यात बीजेएस आणि शासनाच्या विविध विभागांतर्गत जलसंधारणाची विविध कामे सुरू असून, या कामी गावकरी, संबंधित यंत्रणेच्या अधिकारी, कर्मचाºयांचा उत्स्फुर्त सहभाग लाभत असल्याचे दिसून येते.