खोलीकरणाच्या कामादरम्यान नाल्यात आले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 13:53 IST2019-04-28T13:52:55+5:302019-04-28T13:53:27+5:30
मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील कोल्हीयेथे सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत सुरू असलेल्या नाला खोलीकरण व सरळीकरणाच्या कामादरम्याने एका ठिकाणी भुस्तराच्या वरच्या भागात असलेले पाणी मोठ्या प्रमाणात झिरपून साचले आहे.

खोलीकरणाच्या कामादरम्यान नाल्यात आले पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील कोल्हीयेथे सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत सुरू असलेल्या नाला खोलीकरण व सरळीकरणाच्या कामादरम्याने एका ठिकाणी भुस्तराच्या वरच्या भागात असलेले पाणी मोठ्या प्रमाणात झिरपून साचले आहे. यामुळे पाण्यासाठी भटकणाºया गुरांची तहान भागण्यास मोठी मदत होणार आहे.
राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) सामंजस्य करारातून राबविण्यात येत असलेल्या सुजलाम सुफलाम अभियानांतर्गत कोल्ही बोर्डी शिवारात नाला खोलीकरण तसेच नाला सरळीकरणाचे काम करण्यात येत आहे. दोन पोकलन मशीनच्या सहाय्याने हे काम करण्यात येत असून, कामाला चांगली गती देण्यात आली आहे. या नाला खोलीकरणाचे काम निम्म्यावर आले असताना एका ठिकाणी जमिनीच्या भुस्तरात वरील भागात थांबलेले पाणी झिरपण्यास सुरुवात झाली. आता येथे मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले आहे. या पाण्यामुळे गुरांना मोठा आधार मिळणार आहे. ग्रामस्थांनाही वापरासाठी या पाण्याचा आधार होणार आहे. येथे पाणी झिरपण्यास सुरुवात झाल्यानंतर गजानन देवळे मित्र मंडळातर्फे पोकलन मशीनचे तसेच पाण्याचे पुजन करून मशीन चालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोर्डी येथील सरपंच तुळशीराम चव्हाण, उपसरपंच गजानन तागडे, सदस्य श्रीरंग जोशी, मधुकर गुडदे, विलास जोशी तथा बीजेएसचे तालुका समन्वयक वैभव किर्तनकार, गणेश आढाव, मनोज काबरा, कनिष्ठ अभियंता सेवाराम चव्हाण यांच्यासह गजानन देवळे मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी उपस्थित होती. (शहर प्रतीनिधी)