शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मिर्झापूर प्रकल्पातून सोडले अडोळ नदीत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 16:36 IST

शिरपूर जैन (वाशिम) : चालूवर्षीच्या जून महिन्यात घळभरणी पूर्ण झालेल्या मिर्झापूर सिंचन प्रकल्पात यंदा मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : चालूवर्षीच्या जून महिन्यात घळभरणी पूर्ण झालेल्या मिर्झापूर सिंचन प्रकल्पात यंदा मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे. त्याचा रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी फायदा व्हावा, या उद्देशाने जलसंपदा विभागाने प्रकल्पातील पाणी अडोळ नदीत सोडून ते पिकांना पुरविण्यात येत आहे. यामाध्यमातून तीन गावांना पाणी मिळाले असून प्रत्यक्ष प्रकल्पातून दोन गावांना पाणी उपलब्ध झाले आहे.शिरपूर परिसरातील शिरपूर, मिर्झापूर, दुधाळा, पांगरखेडा, वाघी बु. आदी गावांमधील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळत नसे. ही बाब लक्षात घेवून शिरपूरपासून ३ किलोमिटर अंतरावर मिर्झापूर सिंचन प्रकल्प उभारण्यात आला. त्याचे काम चालूवर्षीच्या जून महिन्यात पूर्ण होवून प्रकल्पात ६५ टक्के जलसाठा झाला. दरम्यान, या प्रकल्पातील पाणी थेट शेतकºयांना सिंचनासाठी मिळावे, यासाठी अडोळ नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. यामुळे दुधाळा, वाघी आणि शिरपूर येथील काही शेतकºयांच्या सिंचनाची सोय झाली आहे; तर मिर्झापूर, घाटा आणि पांगरखेडा या गावांमधील शेतकरी थेट प्रकल्पातून पाणी उपसा करित आहेत. 

कालव्याचे काम पूर्ण झाल्यास ६१० हेक्टर जमीन येणार सिंचनाखाली!मिर्झापूर सिंचन प्रकल्पातून साधारणत: ४ किलोमिटर अंतराचा डावा कालवा तयार करण्याची बाब प्रस्तावित आहे. त्यासाठी शेतकºयांनी जमिनी देखील दिल्या. मात्र, या कालव्याचे काम अर्धवट असल्याने यंदा त्याव्दारे सिंचनासाठी पाणी मिळणे अशक्य झाले आहे. जलसंपदा विभागाने प्रलंबित असलेले हे काम पूर्ण केल्यास साधारणत: ६१० हेक्टर शेतजमिन सिंचनाखाली येणार आहे.

टॅग्स :washimवाशिमriverनदीWaterपाणीDamधरण