वाशिममध्ये शिजल्या तुरीच्या घुगऱ्या!

By Admin | Updated: June 14, 2017 20:04 IST2017-06-14T20:04:02+5:302017-06-14T20:04:02+5:30

आगळे-वेगळे आंदोलन

Wasim jumped cooked! | वाशिममध्ये शिजल्या तुरीच्या घुगऱ्या!

वाशिममध्ये शिजल्या तुरीच्या घुगऱ्या!

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शेतकऱ्यांची संपूर्ण तूर खरेदी करण्याचे आश्वासन देऊनही अद्याप मोठ्या प्रमाणात तूर खरेदीअभावी शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास तुरीला कीड लागून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होईल. शासनाने अंगिकारलेल्या या धोरणाच्या निषेधार्थ वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजू चौधरी यांच्या नेतृत्वात असंख्य शेतकऱ्यांनी बुधवार, १४ जून रोजी सकाळी १० वाजता, स्थानिक पुसद नाका येथे तुरीच्या घुगऱ्या शिजवून खाण्याचा आगळेवेगळे आंदोलन केले. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलनस्थळी हजेरी लावून शासनविरोधी घोषणाबाजी केली.

 

Web Title: Wasim jumped cooked!