वाशिम जिल्ह्यातील तलाव तहानलेलेच!

By Admin | Updated: August 8, 2014 00:22 IST2014-08-07T22:14:57+5:302014-08-08T00:22:40+5:30

मध्यम व लघु तलावाच्या जलाशय पातळीत पावसाअभावी अद्यापही वाढ झाली नाही.

Washing tank in Washim district! | वाशिम जिल्ह्यातील तलाव तहानलेलेच!

वाशिम जिल्ह्यातील तलाव तहानलेलेच!

वाशिम: जिल्हय़ातील मध्यम व लघु तलावाच्या जलाशय पातळीत पावसाअभावी अद्यापही वाढ झाली नाही. गत आठवड्यात पाऊस झाला असला तरी तलावातील जलसाठय़ात याचा फारसा फरक पडला नाही. जिल्हय़ातील मध्यम प्रकल्प एकबुर्जी, सोनल व अडाणमध्ये अनुक्रमे २१.५५, २५.७१, १२.३३ टक्के जलसाठा सद्यस्थितीत असल्याचे लघु पाटबंधारे विभागाच्या जलाशयाच्या पातळीच्या अहवालावरुन दिसून येते. अद्यापही जिल्हय़ातील तलाव तहानलेलेच आहेत.
जिल्हय़ात यंदा होत असलेल्या पावसामुळे सद्यस्थितील जिल्हयातील तीन मध्यम व लघु पाटबंधारे अशा एकूण १0३ प्रकल्पांमधील जलसाठय़ाची परिस्थिती चिंताजनक आहे. सद्यस्थितीत एकबुर्जी मध्यम प्रकल्पात २१.५५, सोनल प्रकल्पात २५.७१ तर अडाण प्रकल्पात १२.३३ टक्के जलसाठा आहे. वाशिम तालुक्यात असलेल्या २0 लघु प्रकल्पांपैकी १४ तलांवामध्ये 0 टक्के पाणी जलसाठा आहे तर मालेगाव येथील २0 पैकी ११, रिसोड १३ पैकी ७, मंगरुळपीर १३ पैकी ३, मानोरा येथील २३ पैकी ६ तलावामध्ये 0 टक्के जलसाठा आहे. तर ५0 टक्के जलसाठा केवळ मालेगाव येथील १ व मंगरुळपीर येथील २ तलावातच असून, कारंजा तालुक्यातील बेलखेड व उद्री या तलावात ४९.६२ टक्के जलसाठा आहे.
वाशिम तालुक्यातील लघुप्रकल्पापैकी धुमका येथील तलावात ३२.0१ टक्के, सावंगा ७.९६ टक्के, शिरपुटी ६.७४, वारला ५.८१, जनुना सोनवळ २२.७४, ब्रम्हा १४.६२ टक्के जलसाठा आहे. मालेगाव तालुक्यातील धरणापैकी डव्हा 0.६९, कुर्‍हाळ १९.६७, सुडी ४४.९0, चाकातिर्थ ६२.२७, उध्र्व मोर्णा ३१.00, अडोळ १0.४७, धारप्रिपी १८.९६, कुत्तरडोह ४५.२७, तर मालेगाव तालुक्यातील नेतंसा ३४.४५, बोरखेडी २१.८६, गणेशपूर ७.७९, जवळ १0.0९, मोरगव्हाण १४.७४, वाघी २९.२३ टक्के जलसाठा आहे. रिसोड तालुक्यातील डोळकी धरणात ६ टक्के, मोतसावंगा ८.२८ टक्के, सार्सीबोथ ४.४३ टक्के, सावरगाव २.0४, सिंगडोह १.६४, दस्तापूर २८.५७, सार्सीबोथ ४.३५, जोगलदरी ५९.४९, चोरद ५१.९४, कासोळा ३६.४९ टक्के जलसाठा आहे. मंगरुळपीर तालुक्यातील आमदरी २३.३५, आसोला 0.५१, आसोला इंगोले १८.२६, बोरव्हा ८.९५, चिखली ३.५७, चौसाळा ११.७१, फुलउमरी ७.५६, गारटक १६.५८, गिद १८.२४, गिरोली १५.११, रतनवाडी ४४.२६, रोहणा ४.६६, वाढोड ३.६८, हिवरा बु.११.0६, भिलडोंगर २९.४१, गोंडेगाव २२.२५, कुपटा ८.३३ तर कारंजा तालुक्यातील हिवरा लाहे २७.६१, मोखडपिंप्री ३.५१,ऋषि तलाव १७.५१, शहा १२.९५, सोहल १५.६९, झोडगा २३.५४, उद्री ४९.६२, बग्गी ७.४५, येवता २५.७९, बेलमोळ ४९.३८, मोहगव्हाण ९.६४ ही जलसाठा आहे. जलसाठयात वाढ न झाल्यास सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे.

Web Title: Washing tank in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.