वाशिमचे तीन रायफल शूटर राष्ट्रीय स्पर्धेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 11:30 IST2021-08-22T11:30:05+5:302021-08-22T11:30:10+5:30

Washim's three rifle shooters at the national competition : रायफल शूटिंग या प्रकारामध्ये वाशिमचे ३ खेळाडूंची प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. 

Washim's three rifle shooters at the national competition | वाशिमचे तीन रायफल शूटर राष्ट्रीय स्पर्धेत

वाशिमचे तीन रायफल शूटर राष्ट्रीय स्पर्धेत

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम  :   अहमदाबाद (गुजरात) येथे १४ ते १९ ऑगस्ट, २०२१ या कालावधीमध्ये प्री-नॅशनल शूटिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये रायफल शूटिंग या प्रकारामध्ये वाशिमचे ३ खेळाडूंची प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. 
रायफल शूटिंग स्पर्धेत मुलांपैकी क्षितिज कैलास राऊत याने ४०० पैकी ३८१, अरिहंत अरविंद घुगे, रुषभ अजय ढवळे याने  प्रत्येकी ३७०  गुण घेतले. अशा या तीन शूटरची प्री-नॅशनल रायफल शूटिंग स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे. वाशिम जिल्ह्यात प्रथमच ३ ही निवड झाली आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षक प्रल्हाद आळणे, क्षितिज राऊत, अरिहंत घुगे, रुषभ ढवळे यांचा रफिक मामू, महावितरणचे अतिरिक्त  कार्यकारी अधिकारी पुरुषोत्तम चव्हाण, महेश आकरे, शिक्षक अरविंद घुगे, प्रशिक्षक अनुप मानतकर, अजय ढवळे, जिम कोच सागर आळणे यांनी पुष्पहार घालून सत्कार केला. यावेळी सोनल चव्हाण, जानव्ही मानतकर, मृणाली आकरे उपस्थित होत्या. या विद्यार्थ्यांच्या निवडीचे वाशिम जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे. या सर्व खेळाडूंचे वाशिम जिल्हा रायफल शूटिंग असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप शंकरलाल हेडा, वाशिम रायफल क्लबचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ क्रीडापटू रफीक खान, हाजी खान,  तसेच उपाध्यक्षा आशाबाई गंगाधर शिवणकर, क्लबच्या सचिव निशा गंगाधर शिवणकर, सहसचिव सागर संजय निवलकर, कोषाध्यक्ष महादेव तुर्के, सदस्य विद्याधर नानाजी मानतकर, प्रज्ञा महादेव तुर्के, संतोष आत्माराम आळणे, वैशाली संजय निवलकर, सागर रमेश आळणे, सचिन रमेश आळणे, प्रशिक्षक प्रल्हाद आळणे यांनी काैतुक केले आहे.

Web Title: Washim's three rifle shooters at the national competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम