शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेतील चैतन्यामुळे वाशिमचे अर्थकारण रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 11:05 IST

Business in Washim : व्यापार पूर्वपदावर येत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचा सूर असून लवकरच वाशिमचे अर्थकारण रुळावर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : काेराेना संसर्गाचा प्रकाेप दिवसेंदिवस कमी हाेत असल्याने प्रशासनाने कडक निर्बंधांत शिथिलता दिल्याने पुन्हा एकदा बाजारपेठ गजबजल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या वातावरणात व्यापार पूर्वपदावर येत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचा सूर असून लवकरच वाशिमचे अर्थकारण रुळावर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जीवघेण्या काेराेना विषाणूचा प्रकाेप पुन्हा वाढल्यामुळे शासनाने कडक निर्बंध लागू केले हाेते. या निर्बंधांचे पालन व्हावे,यासाठी जिल्हा प्रशासन आग्रही हाेते. काेराेन विषाणूची साखळी खंडित करण्याच्या उद्देशातून सर्व उद्याेग, व्यवसाय बंद ठेवण्याचे प्रशासनाचे निर्देश हाेते. काेराेनाची लाट ओसरू लागल्याचे दिसताच शासनाने बाजारपेठ सुरु करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे शहरातील बाजारपेठ पुन्हा गजबजून गेली असून नागरिक विविध साहित्य खरेदीसाठी गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. जून महिन्यात काेराेना संसर्ग कमी हाेत असल्याने बाजारपेठ पूर्ववत हाेत असल्याचे दिसून येत आहे.  बाजारपेठेतील उलाढाल व व्यवसायाबाबत माहिती जाणून घेतली असता बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण कायम राहावे याकरिता व्यापाऱ्यांकडून नियमांचे पालन करण्याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. काेराेनाचा प्रादूर्भाव अद्याप कायम असल्यामुळे नागरिकांनी देखील नियमांचे पालन करून बाजारपेठेत खरेदीसाठी यावे,असे  आवाहन व्यापारी वर्गांतून केले जात आहे.

काेराेना संसर्गामुळे सर्वच व्यापार, उद्याेगांवर परिणाम झाला आहे. काेराेनाचा संसर्ग कमी हाेत आहे, आता हा पुन्हा वाढू नये याकरिता सर्वांनी खबरदारी घेऊन व्यवसाय, धंदे वृद्धिंगत हाेत राहावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. व्यवसायास सुरुवात झाली असून, पूर्वपदावर येत आहेत.-जुगलकिशाेर काेठारी,  जिल्हाध्यक्ष, व्यापारी मंडळ

टॅग्स :washimवाशिमbusinessव्यवसायCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक