शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

Washim ZP By-Election : महाविकास आघाडी कायम राहणार की स्वबळावर लढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 11:50 AM

Washim ZP By-Election: जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समितीच्या २७ गणांसाठी १९ जुलै रोजी मतदान होणार आहे

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समितीच्या २७ गणांसाठी १९ जुलै रोजी मतदान होणार आहे. २९ जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ होणार असून, ही पोटनिवडणूक महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र लढली जाणार की राकॉं, कॉंग्रेस व शिवसेना स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरविणार? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.७ जानेवारी २०२० रोजी जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी निवडणूक झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, यासंदर्भात दाखल याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी प्रवर्गातील आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचा मुद्दा समोर करून संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ गणांसाठी पोटनिवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंंग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीची सत्ता असल्याने पोटनिवडणुकीला तिन्ही पक्ष एकत्रितरित्या सामोरे जाणार की स्वतंत्र उमेदवार उभे करणार हे अद्याप ठरले नाही. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे प्रबळ दावेदार व गतवेळचे विजयी उमेदवार तयारी लागले असून, ऐनवेळी आघाडी झाली तर पंचाईत होण्याची भीतीही इच्छुक उमेदवारांमधून वर्तविली जात आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय घडामोडींनीदेखील वेग घेतला असून, तूर्तास तरी प्रबळ उमेदवारांची चाचपणी प्रत्येक पक्षाकडून केली जात असल्याचे दिसून येते. राकॉं, कॉंग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची अद्याप तरी महाविकास आघाडीबाबत चर्चा झाली नसून, वरिष्ठांचा आदेश नेमका काय येईल, याची प्रतीक्षा स्थानिक नेतृत्वाला आहे.

प्रबळ उमेदवारांच्या पळवापळवीची शक्यता!जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाकडून होण्याची दाट शक्यता आहे. या प्रयत्नातूनच प्रबळ उमेदवारांची पळवापळवी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मालेगाव तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे तत्कालिन काही प्रबळ उमेदवार गळाला लागतात का? याची चाचपणी राकॉं, कॉंग्रेससह इतरही पक्षांकडून केली जात असल्याचे तसेच मानोरा तालुक्यात माजी जि.प. सभापती हेमेंद्र ठाकरे यांना कुपटा सर्कलमधून मैदानात उतरविण्याच्या प्रयत्नात कॉंग्रेसचे स्थानिक नेते असल्याचे विश्वसनीय सूत्र आहे. रिसोड तालुक्यात जिल्हा जनविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीचे प्रबळ उमेदवार कोण राहणार? यावर कॉंग्रेस, शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा विशेष वॉच असल्याचे वृत्त आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसंदर्भात इतर पक्षांच्या जिल्हाध्यक्ष किंवा नेत्यांशी अद्याप चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीसंदर्भात वरिष्ठांच्या सुचनेनुसार निर्णय घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल.-  चंद्रकांत ठाकरेजिल्हाध्यक्ष, राकॉं वाशिम

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसंदर्भात कॉंग्रेसचे स्थानिक नेते, आमदारांशी चर्चा केली जाईल. महाविकास आघाडीबाबत इतर पक्षांशी चर्चा झाली नाही. वरिष्ठांच्या निर्णयानुसार निवडणूक लढविली जाईल.- अ‍ॅड. दिलीपराव सरनाईकजिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस वाशिम

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसंदर्भात इतर पक्षांच्या जिल्हाध्यक्षांशी चर्चा झाली नाही. या पोटनिवडणुकीला शिवसेना पक्ष संपूर्ण तयारीनिशी सामोरे जाणार असून, स्वतंत्र उमेदवार उभे करण्याची तयारी आहे.- सुरेश मापारी,जिल्हाध्यक्ष, शिवसेना वाशिम

टॅग्स :PoliticsराजकारणWashim ZPवाशीम जिल्हा परिषदElectionनिवडणूक