वाशिम : जिल्ह्यातून वाहणा-या पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या कोकलगाव बॅरेजेसमधील पाणी वाशिम शहराला पिण्याकरिता देण्यासाठी तातडीची पाणीपुरवठा योजना अंमलात आली. याअंतर्गत सव्वासहा कोटी रुपयांचा निधी खर्चून पाईपलाईन तथा अन्य आवश्यक यंत्रणा उभारण्यात आली असून येत्या काही दिवसात बॅरेजमधील पाणी एकबुर्जी प्रकल्पात सोडले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी गुरूवारी दिली.जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या बॅरेजेसमधून वाशिम शहराला पाणी सोडू नये, या मागणीसाठी बॅरेजेस परिसरात वास्तव्य करणाºया ग्रामस्थांनी मध्यंतरी उपोषण केले होते. २१ फेब्रुवारीला उपोषणकर्त्यांसह इतर नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढला. या विरोधामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकाºयांनी वाशिम शहर तातडीची पाणीपुरवठा योजनाअंतर्गत पैनगंगा नदीवरील कोकलगाव बॅरेज ते एकबुर्जी धरणापर्यंत पाइपलाइन टाकण्याकरिता पोलीस संरक्षणाची मागणी केली. त्यानुसार, ५ पोलीस अधिकारी, ४५ पोलीस कर्मचारी, १३ महिला कर्मचारी व एक आरसीपी प्लाटून असा तगडा बंदोबस्त कामाच्या ठिकाणी तैनात करून कामाला प्रारंभ झाला. ते काम सद्या अंतीम टप्प्यात असून पाईपलाईनची चाचपणी बहुतांशी पूर्ण झाली आहे. लवकरच याअंतर्गत एकबुर्जी प्रकल्पातून वाशिम शहराला पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती नगराध्यक्ष हेडा यांनी दिली.
वाशिमला लवकरच मिळणार कोकलगाव बॅरेजचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 18:40 IST
वाशिम : जिल्ह्यातून वाहणा-या पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या कोकलगाव बॅरेजेसमधील पाणी वाशिम शहराला पिण्याकरिता देण्यासाठी तातडीची पाणीपुरवठा योजना अंमलात आली.
वाशिमला लवकरच मिळणार कोकलगाव बॅरेजचे पाणी
ठळक मुद्दे बॅरेजेसमधून वाशिम शहराला पाणी सोडू नये, या मागणीसाठी बॅरेजेस परिसरात वास्तव्य करणाºया ग्रामस्थांनी मध्यंतरी उपोषण केले होते. पैनगंगा नदीवरील कोकलगाव बॅरेज ते एकबुर्जी धरणापर्यंत पाइपलाइन टाकण्याकरिता पोलीस संरक्षणाची मागणी केली.लवकरच याअंतर्गत एकबुर्जी प्रकल्पातून वाशिम शहराला पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती नगराध्यक्ष हेडा यांनी दिली.