शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

‘शाळेभोवती’ नव्हे...शाळेतच साचले तळे; विद्यार्थ्यांना मिळाली सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 4:47 PM

जिल्हा परिषद शाळा प्रांगणात आणि त्यानंतर वर्गखोलीत पाणी घुसल्याने विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : मालेगाव तालुक्यात २३ सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस झाला असून, डव्हा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात पावसाचे पाणी घुसल्याने विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली. वर्गातही पाणी घुसल्याने शेवटी शाळेला सुट्टी द्यावी लागली. बरेच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या महत्वाच्या प्रश्नाकडे शिक्षण विभागाने साफ दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.२३ सप्टेंबर रोजी मालेगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतकरी सुखावला तर दुसरीकडे डव्हा येथील जिल्हा परिषद शाळा प्रांगणात आणि त्यानंतर वर्गखोलीत पाणी घुसल्याने विद्यार्थ्यांची एकच तारांबळ उडाली होती. डव्हा येथील रस्ता आणि जिल्हा परिषद शाळेची जागा समसमान असल्याने पाऊस आला की थेट शाळेत शिरते. हा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असून, याकडे शिक्षण विभागाने लक्ष दिले नाही. सोमवारी वर्गखोलीत पाणी शिरल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. काही विद्यार्थ्यांनी पावसाचा आनंदही लुटला. पाऊस आला की वर्गखोलीत शिरतो, या बाबीची कल्पना मुख्याध्यापकांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिली. परंतू, तातडीने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. यासंदर्भात प्रभारी गटशिक्षणाधिकारी गजानन परांडे यांच्याशी संपर्क केला असता, सभा सुरू असल्यामुळे केंद्र प्रमुखांना शाळेवर पाठविले आहे. शाळा परिसराची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे परांडे यांनी स्पष्ट केले. शाळेत पावसाचे पाणी शिरल्याची माहिती शिक्षण विभागाला दिली आहे. शाळेत पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून आम्ही तेथे एक नाली काढून पाणी बाहेर जाण्याची व्यवस्था करणार आहोत.- डी एस कीर्तनकारमुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा डव्हा  

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाRainपाऊस