वाशिम - मंगरूळपीर रस्त्यावर ट्रक उलटला; जीवितहानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 16:14 IST2019-07-30T16:11:17+5:302019-07-30T16:14:42+5:30
वाशिम : वाशिमवरून मंगरूळपीरकडे जाणारा एमएच १३ यू ४०५७ क्रमांकाचा ट्रक समोरून येणाºया खासगी बसला बाजू देताना पार्डीटकमोर फाट्यानजीक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला.

वाशिम - मंगरूळपीर रस्त्यावर ट्रक उलटला; जीवितहानी टळली
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिमवरूनमंगरूळपीरकडे जाणारा एमएच १३ यू ४०५७ क्रमांकाचा ट्रक समोरून येणाºया खासगी बसला बाजू देताना पार्डीटकमोर फाट्यानजीक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वाशिम - मंगरूळपीर या मार्गाचे काम सुरू असून, रस्त्याच्या बाजूचा भराव मुरूमाने न भरता काळया मातीने भरण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यालगतचा भाग खोलगट तसेच भूसभुसीत झाला आहे. ३० जुलै रोजी सकाळच्या सुमारास वाशिमवरून एमएच १३ यू ४०५७ क्रमांकाचा ट्रक मंगरूळपीरकडे जात असताना पार्डी टकमोर फाटयाजवळ समोरून येणाº्या खासगी बसने कट मारल्याने ट्रक चालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता, यामध्ये ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. चालकाने प्रसंगावधान राखून ट्रकमधून खाली उडी मारली. या घटनेत कुठलीही जीवीतहानी झाली नाही.