शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या परीक्षेत अमरावती विभागात वाशिम अव्वल; वाशिमचा निकाल ९५.६९ टक्के

By संतोष वानखडे | Updated: May 21, 2024 14:48 IST

मालेगाव तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर; बारावीच्या निकालात मुली आघाडीवर

संताेष वानखडे, वाशिम: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल २१ मे रोजी जाहिर झाला असून, अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल राहिला. अमरावती विभागाचा निकाल ९३ टक्के असून, वाशिम जिल्ह्याचा निकाल ९५.६९ टक्के आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली.

जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १९ हजार ५१६ नियमित विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी १९ हजार ४०९ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी १८ हजार ५७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९५.६९ एवढी आहे. उत्तीर्ण १८ हजार ५७४ विद्यार्थ्यांमध्ये १०८२९ मुले व ७७४५ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९५.२५ तर मुलींची टक्केवारी ९६.३३ टक्के एवढी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित बाजी मारली आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९८.८८ टक्के, कला शाखेचा ९०.४२ टक्के, वाणिज्य शाखेचा ९३.३८ टक्के तर व्होकेशनल शाखेचा ८८.२२ टक्के निकाल लागला आहे.

मालेगाव तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर

बारावीच्या निकालात जिल्ह्यात मालेगाव तालुक्याने यंदा प्रथम क्रमांकावर येण्याचा मान पटकावला आहे. मालेगाव तालुक्याचा बारावीचा निकाल ९७.४५ टक्के लागला. दुसऱ्या क्रमांकावर रिसोड तालुका ९७.१५ टक्के, तिसऱ्या क्रमांकावर वाशिम तालुका ९६.६५ टक्के, चवथ्या क्रमांकावर मानोरा तालुका ९४.४६ टक्के, पाचव्या क्रमांकावर कारंजा तालुका ९२.५३ तर सर्वात कमी निकाल मंगरूळपीर तालुक्याचा ९२.३३ टक्के लागला आहे...........

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालwashimवाशिम