शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : कोरोना मृतकांच्या अंत्यसंस्कारांवर नगर पालिकांचे खर्च झाले ३२ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 12:17 IST

Washim District News : वाशिम, रिसोड, मंगरूळपीर आणि कारंजा लाड या सहा नगर पालिकांच्या कार्यक्षेत्रातील स्मशानभूमींमध्ये सर्व खबरदारी बाळगून अंत्यसंस्कार करण्यात आले.

- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :   जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट वर्षभरापेक्षा अधिक कालावधीतपासून ठाण मांडून आहे. एप्रिल २०२० ते ४ जून २०२१ या कालावधीत कोरोना संसर्गाने एकूण ५८९ जणांना जीव गमवावा लागला. त्यांच्यावर वाशिम, रिसोड, मंगरूळपीर आणि कारंजा लाड या सहा नगर पालिकांच्या कार्यक्षेत्रातील स्मशानभूमींमध्ये सर्व खबरदारी बाळगून अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावर नगर पालिकांनी ३२ लाख ३९ हजार ५०० रुपयांचा खर्च केल्याची माहिती आहे.जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी कोरोना संसर्गाने बाधित पहिला व्यक्ती आढळला होता. तेव्हापासून आजतागायत कोरोना विषाणू संसर्गाचे संकट निवळलेले नाही. संसर्गाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अतिभयंकर ठरली. पहिल्या लाटेत ७३३९, तर १५ फेब्रुवारी ते ३ जून या कालावधीत ३३ हजार १४ नागरिक संसर्गाने बाधित झाले. पहिल्या लाटेत १५६ आणि दुसऱ्या लाटेत ४३१ अशा एकंदरीत ५८७ जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे.दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाने कुठल्याही व्यक्तीचा शासकीय अथवा खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्यास मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात न देता प्लास्टिक पिशवीत पॅक करून मृतदेहावर स्थानिक नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. त्यासाठी लागणाऱ्या पाच पीपीई किट जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून उपलब्ध करून दिल्या जातात, तर मृतदेह जाळण्याकरिता लागणारे लाकूड, गोवऱ्या आणि डिझेलचा खर्च करण्याची जबाबदारी नगरपालिकांकडे सोपविण्यात आलेली आहे. प्राप्त माहितीनुसार नगर पालिकांच्या फंडातून कोरोना मृतकांवर अंत्यसंस्कार करण्याकरिता लागणाऱ्या खर्चाची तरतूद केली जात असून वाशिम नगर पालिकेने ३५४ मृतदेहांवर, कारंजात ५१, रिसोडात ७; तर मंगरूळपीर येथे ३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

वाशिममध्ये ५५४ मृतदेहांना चिताग्नीजिल्ह्यातील वाशिम नगरपालिकेने गेल्या वर्षभरात कोरोनाने मृत्यू झालेल्या ५५४ व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले असून, त्यातील ३६१ मृत्यू शासकीय रुग्णालयात, तर १९३ मृत्यू खासगी दवाखान्यांमध्ये झालेले आहेत. नगरपालिकेने प्रत्येकी एका मृतदेहाच्या अंत्यसंस्कारावर पाच ते साडेपाच हजारांचा खर्च झाल्याचे दर्शविले आहे. त्यात चार क्विंटल लाकूड, ७०० गोवऱ्या, दोन सर्जीकल पीपीई कीट आणि पाच लिटर डिझेल आदी साहित्याचा समावेश असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली.

कोरोना संसर्गाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी नगरपालिकांवर सोपविण्यात आलेली आहे. त्यांच्या फंडातून हा खर्च करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यांनी नियमानुसारच खर्च करणे अपेक्षित आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्वच नगर पालिकांनी आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. - शन्मुगराजन एस. जिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस