वाशिमची बाजारपेठ चवथ्या दिवशीही कडकडीत बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 03:22 PM2020-09-19T15:22:21+5:302020-09-19T15:22:55+5:30

बाजारपेठ कडकडीत बंद असून, जनता कर्फ्यूला व्यापाºयांसह नागरिकांची उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

Washim market closed for fourth day | वाशिमची बाजारपेठ चवथ्या दिवशीही कडकडीत बंद !

वाशिमची बाजारपेठ चवथ्या दिवशीही कडकडीत बंद !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाश्मि : कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून  व्यापाºयांनी वाशिम शहरात १६ सप्टेंबरपासून सात दिवस ‘जनता कर्फ्यू’ची हाक दिली. चवथ्या दिवशीही शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद असून, जनता कर्फ्यूला व्यापाºयांसह नागरिकांची उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. रुग्णसंख्येने ३२०० चा टप्पा ओलांडला असून, मृत्यूच्या संख्येने अर्धशतक ओलांडले. वाशिम शहरात हजारापेक्षा अधिक एकूण रुग्णसंख्या झाल्याने शहरवासियांची चिंता अधिकच वाढली. कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न म्हणून १६ ते २२ सप्टेंबर या दरम्यान वाशिम शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचा महत्वपूर्ण निर्णय शहरातील व्यापारी मंडळाने १३ सप्टेंबरच्या बैठकीत जाहिर केला होता. त्यानुसार १६ सप्टेंबरपासून वाशिम शहरात जनता कर्फ्यू पाळला जात असून, चवथ्या दिवशीही दवाखाने, मेडीकल, दूध संकलन व विक्री वगळता उर्वरीत बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. दुसºया दिवशीही काही दुकाने सुरू असल्याचे आढळून आल्याने शुक्रवारी व्यापारी मंडळ, युवा व्यापारी मंडळाच्या पदाधिकाºयांनी शहरातून फेरफटका मारत सर्वांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शनिवारी बाजारपेठ कडकडीत बंद असल्याचे दिसून आले. नागरिकांनी आणखी तीन दिवस असेच सहकार्य करावे, असे आवाहन व्यापारी मंडळाने केले.


प्रमुख रस्त्यांवर वाहनधारकांची वर्दळ
वाशिम येथील बाजारपेठ बंद आहे; दुसरीकडे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनधारकांची तुरळक वर्दळ कायम असल्याचे शनिवारी दिसून आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापाºयांनी सात दिवस दुकाने बंद ठेवली. त्याअनुषंगाने नागरिकांनीदेखील अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, सर्वांनी शासन नियमांचे पालन करावे, गर्दी करू नये, चेहºयावर नेहमी मास्कचा वापर करावा, असे आवाहन दोन्ही व्यापारी मंडळाने शनिवारी केले आहे.

Web Title: Washim market closed for fourth day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.