शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम-मंगरूळपीर मतदारसंघात प्रचाराचा रंग अद्याप ‘फिका’च!

By admin | Updated: October 6, 2014 00:45 IST

मतदार , कार्यकर्त्यांचे शेतीकामाला प्राधान्य : उमेदवार झाले हतबल.

मंगरूळपीर (वाशिम) : आगामी १५ ऑक्टोंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीला जोमात प्रारंभ झाला असला तरी वाशीम-मंगरूळपीर विधानसभा मतदार संघात अद्यापपर्यंत कुणाच्याच बाजुंनी मतदारांचा कौल दिसुन येत नाही विविध पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते सद्या शेतीच्या कामात व्यस्त असल्याने प्रचाराचा रंग फिक्का पडतांना दिसत आहे.पंचरंगी होणार्‍या निवडणुकीत कोणाची लॉटरी लागेल हे १५ रोजी होणार्‍या मतदाना नंतर दिसेल.पुर्णरचनेत आरक्षीत झालेल्या वाशीम -मंगरूळपीर मतदार संघ राजकीय पुढार्‍यांना अधिक महत्वाचे वाटत नाही.त्यात आघाडीत बिघाडी व युतीत ताटातुट झाल्यामुळे म तदारांचा उत्साह आढळून येत नाही.शासनाचे अधिकारी प्रत्येक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पाहीजे त्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.परंतु ,आज घडीच्या वा तावरण वरून मतदानाच्या टक्केवारीत मोठी घसरण दिसुन येणार आहे.सध्या सोयाबीन काढणीचा काळ असल्यामुळे शेतकरी सोयाबीनची काढणी करण्याच्या गडबडीत आहेत.विधानसभा निवडणुक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आधी शेती नंतर निवडणुक अशा भुमिकेत मतदार आहे निवडणुकीच्या प्रचारांची रणधुमाळी सुरू झाली असली तरी गावोगावी प्रचारासाठी जाणार्‍या उमेदवारांना कार्यकर्ते मिळणे दुर्लभ झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.गेल्या दोन दिवसांपासुन तालुक्यातील ग्रामीण भागात उमेदवारांनी प्रचार कार्याला सुरूवात केली आहे.मात्र, ज्या पध्दतीने राजकीय वातावरण तापायला पाहीजे त्या पध्दतीचे चित्र दिसुन आले नाही.बहुरंगी लढतीत कोण बाजी मारेल हे मतदाना नंतर स्पष्ट होईल.ठिकठिकाणची विविध पक्षाची प्रचार कार्यालये कार्यकत्यार्ंविना ओस पडल्याचे दिसुन येत आहे.मत विभाजना मुळे दर वेळेस केली जाणारी आकडेमोड यंदा कुणीच कर तांना दिसून येत नाही.या आखाड्यात मंगरूळपीर तालुका कोणत्या पक्षाला आघाडी देणार ते निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.