शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

वाशिम,कारंजा व मंगरुळपीर नगर परिषदेची विषय समितीची निवडणूक अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 3:21 PM

नगर परिषद वाशिम, कारंजा व मंगरुळपीरची विषय समित्यांची १८ जानेवारी रोजी निवडणूक अविरोध झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : नगर परिषद वाशिम, कारंजा व मंगरुळपीरची विषय समित्यांची १८ जानेवारी रोजी निवडणूक अविरोध झाली.वाशिम नगर परिषद विषय समिती व सभापती यांची निवडणूक हि अविरोध झाली असुन या निवडणुकी करिता पिठासीन अधिकारी म्हणुन प्रकाश राउत, उपविभागीय अधिकारी वाशिम व त्यांना सहाय्यक म्हणुन डॉ. विकास खंडारे, मुख्याधिकारी नगर परिषद वाशिम यांचे उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी नगराध्यक्ष अशोक शंकरलालजी हेडा , उपाध्यक्ष भानुप्रतापसिंह ठाकुर यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी सर्व सदस्य गण उपस्थित होते.स्थायी समिती - अशोक शंकरलालजी हेडा अध्यक्ष, भानुप्रतापसिंह रामकुमारसिंह ठाकुर उपाध्यक्ष यांचेके स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती , सार्वजनिक बांधकाम समिती आशाताई खटके, नियोजन विकास समिती शेख अजिम शेख इब्राहीम , पाणी पुरवठा व जलनिसा:रण समिती राधिकाताई उत्तमराव पोटफोडे , शिक्षण, क्रिडा व सांस्कृतीक कार्य समिती राजुभाऊ विठोबा भांदुर्गे ,महिला व बालकल्याण समिती आशाताई सचिन मडके , उपसभापती शितलताई माधवराव ईरतकर, स्थायी समिती सदस्य शेख फिरोज शेख ईस्माइल, राहुलभाऊ मोतीराम तुपसांडे , अतुल वंसतराव वाटाणे यांचा समावेश आहे.

मंगरुळपीर : नगर परिषद मंगरुळपीर च्या विषय समिती निवडणुक अविरोध होऊन उपाध्यक्ष वीरेंदर सिंह ठाकुर आरोग्य सभापती, लईक अहमद बांधकाम सभापती , दुर्गा राजू जयस्वाल पाणी पुरवठा सभापती ,सचिन पवार शिक्षण सभापती व ज्योति विश्वास लवटे महिला व बालकल्याण सभापतीपदी निवड करण्यात आली आहे.मंगरुळपीर येथे निवडणुक अधिकारी उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे , मुख्याधिकारी मिलिंद दारोकर यांच्या उपस्थितीत नगरपरिषद कार्यालयात विषय समिती निवडणुक घेण्यात आली. अध्यक्षा डॉ.गजाला खान, उपााध्यक्ष विरेन्द्रसिंह ठाकुर, गटनेता चंदूभाऊ परळीकर, अशोकभाऊ परळीकर, आदिंनी सभापतीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

कारंजा : कारंजा नगर पालिकेच्या सभापती व स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये मो.युसूफसेठ पुंजानी गटाचा वरचष्मा राहिला. या निवडणुकीचे पिठासिन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अनुप खांडे होते. त्यांना मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी सहकार्य केले. नियोजन व विकास समिती सभापती पदी अ‍ॅड.फिरोज छट्टू शेकूवाले, शिक्षण समिती सभापतीपदी शाहीन परवीन ईकबाल हुसैन,आरोग्य सभापतीपदी सलीम शेख लालू गारवे बांधकाम सभापतीपदी मालन भोजा प्यारेवाले, महिला व बालकल्याण वर्षा राजू इंगोले, उपसभापतीपदी रुबीना परवीन इरफान खान तसेच स्थायी समितीमध्ये निसार खान नजीर खान , ईरशाद अली, प्रसन्ना पडसकर यांना घेण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाMangrulpirमंगरूळपीर