शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

वाशिम : वाढीव आरोग्य केंद्रांचा प्रस्ताव शासनदरबारी; सात केंद्र, ३३ उपकेंद्र प्रस्तावित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 1:02 AM

वाशिम : लोकसंख्येच्या तुलनेत शासकीय आरोग्यसेवा अपुरी पडत असल्याच्या पृष्ठभूमीवर आरोग्य विभागाने वाढीव सात प्राथमिक आरोग्य केंद्र, ३३ आरोग्य उपकेंद्रांचा प्रस्ताव शासनदरबारी सादर केला असून, या प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देयापूर्वी मिळाले ११ वाढीव केंद्र, वाढीव ७८ पदांची बिंदूनामावलीही मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : लोकसंख्येच्या तुलनेत शासकीय आरोग्यसेवा अपुरी पडत असल्याच्या पृष्ठभूमीवर आरोग्य विभागाने वाढीव सात प्राथमिक आरोग्य केंद्र, ३३ आरोग्य उपकेंद्रांचा प्रस्ताव शासनदरबारी सादर केला असून, या प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, यापूर्वी वाढीव म्हणून मंजूर झालेल्या दोन प्राथमिक आरोग्य केंद्र, आठ उपकेंद्र व एका ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाचा तिढा सुटला असून, ७८ वाढीव पदांच्या बिंदूनामावलीलादेखील शासन स्तरावरून मंजुरात मिळालेली आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी शासनातर्फे ग्रामीण भागात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांची सुविधा उपलब्ध केली जाते. वाढत्या लोकसंख्येनुसार आरोग्यसेवा केंद्र, मनुष्यबळही अपुरे पडते. त्यानुषंगाने वाढीव ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, मनुष्यबळासंदर्भात शासनाच्यावतीने जिल्हा स्तरावरून बृहत आराखडा मागविला जातो. सन २0११ च्या जनगणनेवर आधारित वाढीव आरोग्य केंद्रांचा बृहत आराखडा शासनातर्फे २0१७ मध्ये मागविला होता. वाशिम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरात घेतल्यानंतर साधारणत: नोव्हेंबर २0१७ मध्ये बृहत आराखडा शासनाकडे पाठविला. या बृहत आराखड्यासंदर्भात आता जिल्हा नियोजन समितीची मंजुरात घेऊन आणखी स्वतंत्र अहवाल पाठविला जाणार आहे. बृहत आराखड्यानुसार, सात नवीन आरोग्य केंद्र, ३३ उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले आहेत. तसेच एक प्राथमिक आरोग्य केंद्र  आणि चार उपकेंद्र अन्यत्र स्थलांतरित करणे प्रस्तावित आहे. आता या प्रस्तावाला शासनाच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. वाढीव आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचा प्रस्ताव मंजूर झाल्यास अधिक दज्रेदार आरोग्यसेवा उपलब्ध होईल, असा विश्‍वास जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जि.प. आरोग्य सभापती सुधीर गोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मेहकरकर यांनी व्यक्त केला.यापूर्वी वाढीव लोकसंख्येनुसार जिल्ह्यात आठ उपकेंद्र मंजूर झाले होते. यापैकी वारा जहागीर, शेलू, कोळेगाव व येवता या चार उपकेंद्रांचे बांधकाम पूर्ण झाले. रुई येथील उपकेंद्राचे बांधकाम सुरू, तर तोरनाळा येथे बांधकाम सुरू होणे बाकी आहे. वाशिम तालुक्यातील सुरकंडी बु. येथे जागा उपलब्ध नसल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतने दिल्याने, सदर उपकेंद्र अन्यत्र स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला.  

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटल