वाशिम : सव्वालाख शेतकऱ्यांचा सात-बारा होऊ शकतो कोरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 02:05 PM2019-12-03T14:05:33+5:302019-12-03T14:05:40+5:30

वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा या सहाही तालुक्यांतील जवळपास सव्वा लाख थकबाकीदार शेतकºयांचा सात-बारा कोरा होण्याची शक्यता आहे.

Washim: Farmers can get total loan waiver | वाशिम : सव्वालाख शेतकऱ्यांचा सात-बारा होऊ शकतो कोरा

वाशिम : सव्वालाख शेतकऱ्यांचा सात-बारा होऊ शकतो कोरा

googlenewsNext

- संतोष वानखडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्यात सत्तारूढ झालेल्या नवीन सरकारकडून सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानुसार संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय झाल्यास जिल्ह्यातील सव्वा लाखावर शेतकºयांचा सात-बारा कोरा होण्याची शक्यता आहे. संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय सरकारकडून केव्हा जाहिर होतो, याकडे जिल्ह्यातील शेतकºयांचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे या निर्णयाच्या शक्यतेमुळे थकबाकीदार शेतकºयांच्या माहितीची जुळवाजूळव प्रशासनाकडून केली जात आहे.
मे व जून २०१७ या महिन्यात पीक कर्जमाफीसाठी विविध टप्प्यात आंदोलने झाल्याने राज्य सरकारने जून २०१७ या महिन्यात कर्जमाफीची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१७ अखेर थकबाकीदार शेतकºयांना १ लाख ५० हजार पर्यंत कर्जमाफी व १ लाख ५० हजार वरील शेतकºयांना वनटाईम सेंटलमेंट योजना लागू केली. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील संपूर्ण पात्र शेतकºयांना मिळालेला नाही.
२०१९ मध्ये सत्तांतर झाल्याने संपूर्ण कर्जमाफीच्या प्रश्नाने जोर पकडला. २८ नोव्हेंबर रोजी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तारुढ झाले असून, सरकारच्या किमान समान कार्यक्रमाची घोषणाही करण्यात आली आहे. त्यामध्ये शेतकºयांना तातडीने कर्जमाफी देण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार राज्यातील शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारकडून लवकरच घेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा या सहाही तालुक्यांतील जवळपास सव्वा लाख थकबाकीदार शेतकºयांचा सात-बारा कोरा होण्याची शक्यता आहे.
किमान समान कार्यक्रमानुसार शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केल्यास जिल्ह्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांना कर्जमाफी मिळणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनातर्फे त्यामुळे जिल्हयातील २ लाख ९७ हजार ६६८ शेतकºयांचा सात-बारा कोरा होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने जिल्हा अग्रणी बँक तसेच उपनिबंधक कार्यालयातर्फे पीककर्जाची उचल करणाºया जिल्ह्यातील संपूर्ण शेतकºयांची माहिती संकलित केली जात आहे.
शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय नवीन सरकारकडून केव्हा जाहीर होतो, याकडे शेतकºयांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Washim: Farmers can get total loan waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.