शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

वाशिममध्ये शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण हटविणे सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 3:37 PM

रविवार, २ जूनपासून चोख पोलिस बंदोबस्तात सदर अतिक्रमण हटविण्यास प्रशासनाच्या वतीने प्रारंभ करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातून पुसद आणि शेलूबाजारकडे जाणाºया रस्त्याच्या कडेला असलेल्या शासकीय जमिनीवर शेकडो लोकांनी अतीक्रमण करून कच्चा स्वरूपातील घरे थाटली. काही भूखंडांची परस्पर विक्री देखील करण्यात आली. याप्रकरणी सर्वप्रथम ‘लोकमत’ २१ एप्रिल २०१९ च्या अंकात ‘महसूल आणि नझूलची जमीन अतीक्रमणाच्या विळख्यात’, या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्यानंतरही विविधांगी वृत्तांच्या माध्यमातून हे प्रकरण उजेडात आणले. त्याची दखल घेत रविवार, २ जूनपासून चोख पोलिस बंदोबस्तात सदर अतिक्रमण हटविण्यास प्रशासनाच्या वतीने प्रारंभ करण्यात आला.खदान परिसर म्हणून वाशिमकरांना परिचित असलेल्या वाशिम-शेलू मार्गावरील गट क्रमांक ४४६ आणि ४४७ मध्ये साधारणत: २५ एकर ई-क्लास जमीन वसलेली आहे. याच परिसरात मोठा उड्डानपूल तयार होत असल्याने या जागेला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. परिसरात प्रामुख्याने मुरूम हे गौणखनिज निघत असल्याने त्यापासून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळू शकतो; मात्र गत २० ते २५ वर्षांच्या कालावधीत या जमिनीवर काही लोकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून घरे थाटली आहेत; तर काहीठिकाणी सिमेंट पोल, तार फेन्सींगव्दारे जागा अडवून ठेवण्यात आली. विशेष गंभीर बाब म्हणजे वाशिमवरून शेलुबाजारकडे जाणाºया रस्त्याच्या एका बाजूला असलेले मानमोठे नगर आणि दुसºया बाजूला असलेल्या ख्रिश्चन समाजबांधवांच्या स्मशानभूमीपर्यंत महावितरणनेही विद्यूत खांब उभे करून अतिक्रमणधारकांच्या मागणीप्रमाणे विजपुरवठा दिला आहे. या सर्व बाबी ‘लोकमत’ने विविधांगी वृत्तांच्या माध्यमातून उजागर केल्या. दरम्यान, या वृत्तांची तडकाफडकी दखल घेत वाशिमचे जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी २१ एप्रिल रोजीच तहसीलदारांना निर्देश देत अतीक्रमणधारकांच्या सर्वेक्षणास सुरूवात केली होती. त्यानंतर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी, भूमी अभिलेखचे उपअधिक्षक आदी अधिकाºयांचे ‘अतिक्रमण निष्कासित पथक’ गठीत करून २ जूनपासून प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्यास सुरूवात करण्यात आली. यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim Nagarpalikaवाशिम नगरपालिका