शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

वाशिम : नगरपरिषद राजकारणात ‘तुझे माझे जमेना तुझ्या विना करमेना’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 1:01 AM

वाशिम : वाशिम जिल्हयातील नगरपालिका राजकारणामध्ये अनेक ठिकाणी अधिकारी, पदाधिकारी, गटनेते व नगरसेवकांमध्ये मने जुळत नसल्याने अनेक वाद निर्माण होत आहेत. असे असले तरी आपली कामे करुन घेण्यासाठी एकमेकांची मनधरणी करुन आपला उ्देश सफल केला जात आहे.

ठळक मुद्देवाशिम नगरपरिषद विकास कामाच्या कारणावरुन पडतेय ठिणगी

नंदकिशोर नारे। लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम जिल्हयातील नगरपालिका राजकारणामध्ये अनेक ठिकाणी अधिकारी, पदाधिकारी, गटनेते व नगरसेवकांमध्ये मने जुळत नसल्याने अनेक वाद निर्माण होत आहेत. असे असले तरी आपली कामे करुन घेण्यासाठी एकमेकांची मनधरणी करुन आपला उ्देश सफल केला जात आहे. जिल्हयातील चारही नगरपालिकांमधील राजकारण्यांची आजची स्थिती ‘तुझे माझे जमेना अन तुझ्या विना करमेना’ झालेली दिसून येत आहे. वाशिम नगरपरिषदेचा विचार केला तर येथे जनतेने शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून दिले आहेत. उपाध्यक्ष हे भाजपाचे आहेत. या दोघांमध्ये चांगला समन्वय दिसून येत असला तरी यांच्याच पक्षातीलच काही शुक्राचार्य यांना बेचैन करतांना दिसून येतात. विकासाची जाण असलेले वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा व गोरगरिबांसाठी धावून जाणारे, संकटात असलेल्यांना मदत करणारे म्हणून परिचित असलेले वाशिम नगरपालिकेचे उपाध्यक्ष बंटी उर्फ रुपेश वाघमारे याही परिस्थितीत सर्वांना सोबत घेवून चालण्याचे यशस्वी कार्य करतांना दिसून येत आहेत. यामध्ये वाशिम येथे लाभलेले मुख्याधिकारी गणेश शेटे हे कोणत्याही फाईल पेंडींग न ठेवता नियमात बसणारी सर्वच कामे वेळेच्या आत पूर्ण करीत असल्याने काही वर्षाआधी नगरपरिषदेतील कामे लवकर होत नाहीत हे खोडून काढण्यात आले आहे. सद्यस्थितीत वाशिम नगरपरिषदेमध्ये मोठया प्रमाणात विकास कामे होत आहेत. या कामांमुळे मात्र नगरपरिषद राजकारणातील नेते, नगरसेवकांमध्ये अनेकवेळा ठिणगी पडतांना दिसून येत आहेत. शहरातील अनेक भागातील विकास कामे सत्तेतीलच काही नगरसेवकांनी बंद पाडली तर ईतर ठिकाणी काही नगरसेवकांनी होत असलेल्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शहरात होत असलेली विकास कामे अतिशय संथगतिने सुरु असल्यामुळे नागरिकांना त्रास होतोय यात दुमत नाही परंतु राजकारणी मजबूत व टिकाऊ कामासाठी उशिर लागणारचं असे म्हणून यावर पांघरुन घालण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहेत. शहरात अनेक भागात नाल्यांचे काम सुरु आहेत. यामध्ये काहींनी आठकाठी आणल्याने अनेक ठिकाणची कामे बंद पडलेली दिसून येतात. तसेच नाल्याबांधल्यानंतर त्या उघडयाच ठेवण्यात आल्या असल्याने नागरिकांना घरात जाण्यासाठी माकडांसारख्या उडया मारुन प्रवेश करावा लागत आहे,याबाबत मात्र कोणालाही काहीचं देणे घेणे दिसून येत नाही. यामुळे नागरिकांचा रोष नगरपरिषदमध्ये सत्ता करणार्‍या राजकारण्यांवर केला जात आहे. अनेक नगरपरिषद विभागात स्वता नगरसेवक बसून आपली कामे करतांना दिसून येत आहेत. याकडे वाशिम नगरपरिषदेतील राजकारण्यांनी लक्ष देवून आपसात समेट करुन शहराचा विकासाकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. 

रस्त्यावरील अतिक्रमणांना बगलवाशिम शहरातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण असतांना याबाबत मात्र कोणहीही आवाज उठवितांना दिसून येत नाही. यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता रस्त्यावर अतिक्रमण करुन आपली दुकाने थाटणारे कोणाचे ना कोणाचे मतदार आहेत. त्यांना नाराज करणे उचित राहणार नसल्याने याला बगल दिल्या जात आहे. यावेळी अश्या विचार करणार्‍या महाशयांनी हाही विचार करणे गरजेचे आहे की, ज्यांना त्रास होतोय ते सुध्दा आपले मतदार आहेत .  

टॅग्स :washimवाशिम