शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात लवकरच दैनंदिन २७ मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 12:27 IST

Washim News : दैनंदिन २७ मे. टन ऑक्सिजन उपलब्ध करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने केले आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात एका दिवशी जास्तीत जास्त ७ मे. टन ऑक्सिजनची गरज भासली होती. संभाव्य तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू नये म्हणून जिल्ह्यात दैनंदिन २७ मे. टन ऑक्सिजन उपलब्ध करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने केले आहे.देशात साधारणत: मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. वाशिम जिल्ह्यात ३ एप्रिल रोजी कोरोनाचा शिरकाव झाला. पहिल्या लाटेत जिल्ह्याला अकोला, जालना, अमरावती आदी ठिकाणावरून ऑक्सिजनचा पुरवठा झाला. जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्लांट नसल्याने ऑक्सिजनबाबत इतर जिल्ह्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याने, यासंदर्भात ‘लोकमत’ने सर्वप्रथम वृत्त प्रकाशित करीत शासन, प्रशासनाचे लक्ष वेधून घेत पाठपुरावा सुरू ठेवला. दुसऱ्या लाटेत एप्रिल महिन्याच्या अखेरीस जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात ऑक्सिजन निर्मिती प्लांट कार्यान्वित झाला. दुसऱ्या लाटेत खासगी कोविड रुग्णालयांत अनेक रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडसाठी वेटिंगवर राहावे लागले. तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे तिपटीने आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना शासनस्तरावरून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या. ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्लांटवर भर देण्यात येत आहे. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात एका दिवशी जास्तीत जास्त ७ मे. टन ऑक्सिजनची गरज भासली होती. या अनुषंगाने तिसऱ्या लाटेत दैनंदिन २७ मे. टन ऑक्सिजन उपलब्ध करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात ऑक्सिजननिर्मितीचे तीन प्लांट साकारले असून, कारंजा येथील एक प्लांट पूर्णत्वाकडे येत आहे. याशिवाय जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात एक प्लांट साकारला जाणार आहे.

संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात दैनंदिन २७ मे. टन ऑक्सिजन उपलब्ध होईल, याचे नियोजन करण्यात आले. दुसऱ्या लाटेत दैनंदिन ७ मे.टन ऑक्सिजनची गरज भासली होती. सरकारी रुग्णालयांतील ऑक्सिजन बेडची संख्यादेखील वाढविण्यात आली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनीदेखील आवश्यक ती खबरदारी घ्यावी.-  शण्मुगराजन एस. जिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमOxygen Cylinderऑक्सिजन