वाशिम जिल्हा पोलीस दलाला ‘आयएसओ’ दर्जा
By Admin | Updated: April 17, 2017 02:27 IST2017-04-17T02:27:28+5:302017-04-17T02:27:28+5:30
वाशिम : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासह सहा पोलीस स्टेशनला ‘आयएसओ’ दर्जा प्राप्त झाला.

वाशिम जिल्हा पोलीस दलाला ‘आयएसओ’ दर्जा
वाशिम : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासह सहा पोलीस स्टेशनला ‘आयएसओ’ दर्जा प्राप्त झाला असून्,ा अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांना रविवारी ‘आयएसओ’ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर व अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांनी कार्यालयात भौतिक सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच सायबर गुन्हेगारीला आळा घालणे, कालबाह्य जुना रेकॉर्डची पद्धती बाजूना सारून नवीन रेकॉर्ड अद्ययावत करणे आदी कामगिरी केली आहे. याची दखल घेत पोलीस अधीक्षक कार्यालयाला ‘आयएसओ’ दर्जा प्राप्त झाला आहे. रविवारी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ विठ्ठल जाधव यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट देऊन पोलीस मुख्यालयात सायबर लॅबचे उद्घाटन केले. तसेच अधीक्षक कार्यालय, वाचक शाखा, संगणक शाखा, पोलीस अधीक्षक यांचे दालन, जिल्हा विशेष शाखा, स्थानिक गुन्हे शाखा येथील पाहणी केली. पोलीस अधीक्षक होळकर यांना ‘आयएसओ’ प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे, उपविभागीय अधिकारी जयकुमार चक्रे आदींची उपस्थिती होती.