शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात दिवसाकाठी ४० रोहित्र नादुरूस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 12:29 IST

Mahavitran News २४ नोव्हेंबर रोजीपर्यंत २८२ रोहित्र बंद पडले असल्याची माहिती महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रब्बी हंगामाला सुरुवात झाली असताना वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. वाढत्या वीजभारामुळे दिवसाला सरासरी ४० रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रकार जिल्ह्यात घडत आहेत. त्यामुळे शेतकºयांना सिंचनात अडचणी येत आहेतच शिवाय बंद पडणाºया रोहित्रांमुळे महावितरणची डोकेदुखीही वाढली आहे. जिल्ह्यात २४ नोव्हेंबर रोजीपर्यंत २८२ रोहित्र बंद पडले असल्याची माहिती महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली.वाशिम जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक आणि कृषीपंपांना वीज पुरवठा करण्यासाठी १० हजार रोहित्र बसविण्यात आले आहेत. वेगवेगळ्या वीज उपकेंद्रांतर्गत वेगवेगळ्या फिडरवर हे रोहित्र बसवून सुरळीत वीज पुरवठा देण्याच कसरत महावितरणला करावी लागत आहे. सततच्या कमीअधिक दाबामुळे रोहित्र जळण्याच्या घटना जिल्ह्यात वारंवार घडतात. रोहित्रांतील बिघाडाचे वार्षिक प्रमाण सरासरी १५ टक्के आहे. तथापि, रब्बी हंगामाला सुरुवात होताच या प्रकारात लक्षणीय वाढ होते. सद्यस्थितीत हीच समस्या शेतकरी आणि महावितरणला त्रस्त करून सोडत आहे. रब्बी हंगामासाठी विजेची मागणी वाढली असताना रोहित्रांवर भार वाढून दिवसाला सरासरी ४० तर महिन्याकाठी ७०० ते ८०० रोहित्र नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांसाठी अशक्य झाले आहे. सद्यस्थितीत वाशिम जिल्ह्यात विविध वीज उपकेंद्रांतर्गत मिळून २८२ वीज रोहित्र बंद असल्याची माहिती महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी मंगळवारी दिली.

अनधिकृत जोडण्या आणि विजेच्या वाढलेल्या वापरामुळे रोहित्र बिघाडाचे प्रमाण वाढले आहे. शेतकºयांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने रोहित्र दुरुस्त करून ऑईल उपलब्ध करण्यासह रोहित्र बसविले जात आहेत.-आर. जी. तायडेकार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम 

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरणAgriculture Sectorशेती क्षेत्र