शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

वाशिम:  संगणक साक्षरता दिनानिमित्त संगणक वापर जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 2:50 PM

वाशिम:  जागतिक संगणक साक्षरता दिनानिमित्त  स्थानिक एसएमसी इंग्लिश स्कूलमध्ये आयटी क्लबच्यावतीने २ डिसेंबर रोजी संगणक वापराबाबत जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना मार्गदर्शन  एसएमसी आय.टी क्लबचे आयोजन 

वाशिम:  जागतिक संगणक साक्षरता दिनानिमित्त  स्थानिक एसएमसी इंग्लिश स्कूलमध्ये आयटी क्लबच्यावतीने २ डिसेंबर रोजी संगणक वापराबाबत जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.

माहिती तंत्रज्ञानाच्या डिजिटल युगात माहिती संकलनासाठी विवीध उपकरणे वापरत असताना योग्य ती खबरदारी घेऊन संगणकाचा वापर मुल्याधिष्टीत व्हावा असे प्रतिपादन शाळेच्या प्राचार्य मिना उबगडे यांनी यावेळी केले. दरम्यान नाण्यांचा दोन बाजुप्रमाणे प्रत्येक घटकाला चांगली आणि वाईट अशा दोन बाजु असून कुठलेही तंत्रज्ञान स्वत:हुन विघातक असु शकत नाही अशी प्रतिक्रीया प्रमोद खासभागे यांनी दीली. दरम्यान आय टीक्लबच्या विद्यार्थ्यांनी सायबर जागृती, संगणक आणि मानवी मुल्य यावर आधारीत पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन सादर करून आधुनिक युगात संगणक शिकण्यासोबतच ते योग्य रीतीने वापरण्यासंदर्भात आपल्या सादरीकरणातुन माहिती दीली. सायबर जगतामध्ये उद्भवणारे धोके लक्षात घेता आय टी क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व समाजाला संगणकाच्या आणि आंतरजाल संबंधित योग्य वापराची माहिती होण्यासाठी आय टी क्लब ही संकल्पना महत्वाची वाटते असे मत आय टी शिक्षक व आय टी क्लबचे विभाग प्रमुख राम धनगर यांनी व्यक्त केले. दरम्यान आयटी क्लबचे अध्यक्ष आदित्य गावंडे, उपाध्यक्ष सानिका इंगळे, सहसचिव श्रेया कंदोई, जंसंपर्क प्रमुख नेहा गोरे, माध्यम प्रमुख सई लहाने व सदस्य कल्याणी काटकर ,आदित्य घुगे ,ऋतूजा वानखेडे, मानसी वानखेडे आणि पुर्वा अग्रवाल यांनी संगणक जागृतीवर आपले पीपीटी सादरीकरण केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक संजय दळवी, युवराज कुसळकर, संदीप बोदडे सर, स्मिता पाटील,स्वाती बोदडे यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन  शाळेच्या प्राचार्य मिना उबगडे आणि पर्यवेक्षिका प्रनिता हरसुले यांच्या मार्गदर्शनाखाली आय टी शिक्षक राम धनगर यांनी केले सुत्र संचालन श्रेया कंदोई तर आभार शिक्षक संजय दळवी यांनी मानले कार्यक्रमाला शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती

टॅग्स :Schoolशाळा