डिजिटल युगात ग्रंथांचे महत्व अनन्यसाधारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:25 AM2017-12-01T00:25:14+5:302017-12-01T00:25:39+5:30

आजचे युग हे संगणकाचे युग आहे. या डिजिटल युगातही ग्रंथांचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे मत परिसंवादातील वक्त्यांनी व्यक्त केले.

 The importance of texts in the digital age is unique | डिजिटल युगात ग्रंथांचे महत्व अनन्यसाधारण

डिजिटल युगात ग्रंथांचे महत्व अनन्यसाधारण

Next
ठळक मुद्देपरिसंवादातील वक्त्यांचा सूर : गोंदिया ग्रंथोत्सव २०१७

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आजचे युग हे संगणकाचे युग आहे. या डिजिटल युगातही ग्रंथांचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे मत परिसंवादातील वक्त्यांनी व्यक्त केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि श्री शारदा वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने वाचनालयाच्या बजाज सभागृहात बुधवारी (दि.२९) गोंदिया ग्रंथोत्सव- २०१७ च्या निमित्ताने ‘डिजिटल युगात ग्रंथाचे महत्व’ या विषयावर परिसंवादात वक्ते आपले विचार व्यक्त करताना बोलत होते. परिसंवादामध्ये राज्य ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष डॉ. रमेश जनबंधू, प्रा.कविता राजाभोज व प्रा. बबन मेश्राम यांनी सहभाग घेतला.
डॉ. जनबंधू म्हणाले, आजचे ग्रंथालय हे आधुनिकतेकडे वळलेले असावे. डिजिटायझेशनच्या माध्यमातून ग्रंथ उपलब्ध झाले आहे. माहितीचे आदान प्रदान झाले पाहिजे. पुस्तकाच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान इतरांपर्यंत पोहोचिवण्याचे काम झाले पाहिजे. ग्रंथांच्या व्याख्या आज बदलत आहे. त्यानुसार ग्रंथालयाने बदल स्विकारले पाहिजे. डिजिटल युगातही ग्रंथालयाचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी सांगितले. डिजिटायझेशनचे फायदे भरपूर असल्याचे सांगून डॉ. जनबंधू म्हणाले, ग्रंथालयांनी आता विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकले पाहिजे. संगणकाचा वापर करु न जास्तीत जास्त लोकांना संगणक साक्षर व सुसंस्कृत केले पाहिजे.
प्रा. राजाभोज म्हणाल्या, युगाची परिभाषा ही अष्मयुगापासून हळूहळू बदलत गेली आहे. माणसाची परिभाषा बदलत गेली. त्याचप्रकारे साहित्यही बदलत गेले.काळाप्रमाणे माणसानेही बदल स्वीकारणे गरजेचे आहे. डिजिटल युगात आपण स्क्र ीनवर वाचतो, पाहतो, पण लक्षात किती राहते हा महत्वाचा प्रश्न आहे. पण आपण ग्रंथाचे वाचन केले तर कायम लक्षात राहते. प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांला मोबाईल घेऊन न देता वाचनासाठी पुस्तके घेवून दिली पाहिजे. वाचनाचे संस्कार आले नाही तर आपण आजच्या युगात जगू शकणार नाही. पूर्वी वाचन संस्कृती ही मर्यादित लोकांकडे होती, असे त्यांनी सांगितले. प्रा. मेश्राम म्हणाले की, आजची पिढी ही डिजिटल झाली आहे. ज्ञानाच्या कक्षा वाढल्या आहेत. डिजिटलमुळे सर्व जग जवळ आले आहे. जग कितीही बदलले असले तरी ग्रंथाचे महत्व कमी झालेले नाही. आजही वाचकांचा ग्रंथावर १०० टक्के विश्वास आहे. पण ई-बुकवर विश्वास ठेवणे आजही अवघड जाते. ग्रंथालयाचे स्वरु प आज बदलले आहे. ते आज ज्ञानाचे मंदिर झाले आहे. ज्ञानरुपी या मंदिराचे महत्व दिवसेंदिवस वाढतच आहे. ग्रंथालयातून ज्ञानदानाचे कार्य करण्यात येत आहे. १८ वे शतक हे क्र ांतीचे होते. क्रातिकारी विचारांचा प्रभाव समाजावर झाला त्यामुळे विचारसरणी प्रगल्भ झाल्याचे त्यांनी सांगितले. आज आपण २१ व्या शतकात वावरत असल्याचे सांगून प्रा. मेश्राम म्हणाले, ग्रंथ हे माहिती व ज्ञान देण्याचे काम करतात. व्यक्तीची आवड निवड निर्माण झाली पाहिजे. ग्रंथालये हे ज्ञानात भर घालण्याचे काम करतात.
व्यक्तीला वाचनास प्रवृत्त करण्याचे काम ग्रंथालये करतात. मानवी समाजाचा विकास ग्रंथालयामुळे साधला जात असल्याचे त्यांनी सांगितले. डिजिटल युगात ग्रंथांचे महत्व या विषयांवर प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी ग्रंथप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
संचालन आणि उपस्थितांचे आभार जिल्हा ग्रंथालय संघाचे सदस्य विनायक अंजनकर यांनी मानले.

Web Title:  The importance of texts in the digital age is unique

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.