शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम : चंद्राच्या लख्ख प्रकाशात दिसला लांडगा, हरिण अन् बिबटही!

By सुनील काकडे | Updated: May 24, 2024 15:45 IST

वैशाख पाैर्णिमेला काटेपूर्णा अभयारण्यात झाली प्राणी गणना

वाशिम : वाशिम आणि अकोला या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील ६५०० हेक्टरवर वसलेल्या घनदाट काटेपूर्णा अभयारण्यात वैशाख पाैर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशात वन्यजीव व प्राणी गणना पार पडली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या वन्यप्रेमी व  पर्यटकांनी पानवठ्यांलगत उभारण्यात आलेल्या १० मचानांवर रात्रभर जागून वन्यप्राण्यांच्या हालचालींची नोंद घेतली. यादरम्यान लांडगा, हरिण अन् बिबटही दृष्टीस पडल्याने वन्यप्रेमींचा उत्साह द्विगुणित झाला. 

वैशाख पाैर्णिमेच्या रात्री चंद्राचा लख्ख प्रकाश धरतीला प्रकाशमान करतो. त्यामुळे दरवर्षी काटेपूर्णा अभयारण्यातील वन्यप्राण्यांचे दर्शन आणि त्यांची हालचाल नोंदवून घेण्याकरिता ही रात्र वन्यप्रेमींसाठी खुली करून दिली जात असते. जैवविविधता आणि वनसंपदेने नटलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात बिबट, अस्वल, चौसिंगा, काळवीट, नीलगाय, चितळ, रानडुक्कर, सायाळ, खोपळ, रानकुत्रे, सांबर, हरियाल, नौरंग, सर्पगरुड, सातभाई, रातवा, खंड्या, चंडोल, घार, तुरेवाला सर्पगरुड, टकाचोर, तांबट आदी पशूपक्ष्यांच्या प्रजाती पाहावयास मिळतात.

दरम्यान, २३ मे रोजी दुपारी २ वाजतापासूनच काटेपूर्णा अभयारण्यातील १० कृत्रीम पाणवठ्यांलगत उभारलेल्या मचानांवर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या वन्यप्रेमींनी चढाई करून वन्यजीवांची प्रतीक्षा करणे सुरू केले. यादरम्यान हरिण, काळवीट, लांडगा, नीलगाय, रानडुक्कर या प्राण्यांसह अनेक पक्ष्यांचेही जवळून दर्शन घेण्याची संधी वन्यप्रेमींना प्राप्त झाली. 

चंद्राच्या लख्ख प्रकाशात मचानावर बसून प्राण्यांच्या हालचाली टिपताना स्वर्गीय आनंदाची अनुभती झाली. रात्रीच्या निरव शांततेत पशूपक्ष्यांचे आवाज ऐकताना विलक्षण आनंद मिळाला.मयुरेश वाठारकर,निसर्गप्रेमी, पुणे 

प्राणी गणना उपक्रमाच्या माध्यमातून पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात काटेपूर्णा अभयारण्याला जवळून अनुभवता आले. विविध प्राण्यांचे व पक्ष्यांचे आवाजही ऐकावयास मिळाल्याने निसर्ग व्यासंगाचा परिपूर्ण आनंद लुटता आला.राम धनगर,निसर्गप्रेमी, वाशिम६५०० हेक्टरवर वसलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात विविध प्रजातींचे प्राणी व पक्ष्यांचा वावर आहे. वैशाख पाैर्णिमेच्या रात्री मचानांवरून त्यांच्या हालचाली टिपताना वेगळ्या आनंदाची अनुभूती मिळाली.गणेश देशमुख, निसर्गप्रेमी, बुलढाणावैशाख पाैर्णिमेच्या रात्री चंद्राचा लख्ख प्रकाश असतो. ती संधी साधत वन्यप्राण्यांची हालचाल टिपता यावी, यासाठी कृत्रीम पाणवठे आणि १० मचान उभारण्यात आले होते. भविष्यात मचानांची संख्या वाढविण्याचा विचार आहे.पवन जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी काटेपूर्णा अभयारण्य

टॅग्स :washimवाशिम