शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

वाशिम: जिल्ह्यात महाबीजचे ३०५  बीजोत्पादक काळ्या यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 12:13 IST

Mahabeej News : शहानिशा करून महाबीजच्या व्यवस्थापनाने या शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकले आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात महाबीजसाठी खरीप हंगामात बीजोत्पादन करणाऱ्या ३०५ शेतकऱ्यांना महाबीज व्यवस्थापनाने काळ्या यादीत टाकले आहे. या शेतकऱ्यांनी गतवर्षी सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमात सहभाग घेऊनही सोयाबीनचे उत्पादन झाल्यानंतर  ते उगवण क्षमता चाचणीत पास होऊनही महाबीजला न देता खासगी बाजारात विक्री केली होती. त्याची शहानिशा करून महाबीजच्या व्यवस्थापनाने या शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकले आहे.  वाशिम जिल्ह्यात गतवर्षी १० हजार ३५७ हेक्टर क्षेत्रावर महाबीजकडून बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात ३ हजार ४६६ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यात सोयाबीनचे प्रमाण सर्वाधिक होते. जवळपास साडे सात हजार हेक्टरवर केवळ सोयाबीनचा बिजोत्पादन कार्यक्रम महाबीजकडून राबविला गेला. या कार्यक्रमांतर्गत उत्पादित शेतमालाची महाबीजकडून खरेदी केली जाते. ही खरेदी करताना शासनाचे हमीभाव किंवा बाजार समित्यांत जानेवारी आणि डिसेंबर महिन्यात असलेले सर्वाधिक दर गृहीत धरले जातात. शिवाय त्यात २० टक्के आगाऊ रक्कमही शेतकºयांना बोनस म्हणून दिली जाते. गतवर्षी बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदीसाठी महाबीजने नमुने संकलित केले आणि त्याची उगवण क्षमता प्रयोगशाळेत तपासून घेतली. या प्रक्रियेअंतर्गत बियाणे पास झालेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी ३०५ शेतकऱ्यांनी महाबीजला बियाणे न देता ते खासगी बाजारात विकले. त्यामुळे महाबीजच्या व्यवस्थापनाने त्यांना नियमानुसार काळ्या यादीत टाकले. आता या शेतकऱ्यांना महाबीजच्या बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही.

महाबीजच्या बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेले बियाणे उगवण क्षमता चाचणीत पास झाल्यानंतर करारानुसार महाबीजला देणे आवश्यक आहे. यंदा काही शेतकऱ्यांनी बियाणे उगवण क्षमता चाचणीत पास होऊनही महाबीजला न देता खासगी बाजारात विकले. ही बाब निराशाजनक आहे. यामुळे महाबीजच्या बीजोत्पादनावर परिणाम होऊ शकतो.- डॉ. प्रशांत घावडे, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज वाशिम 

टॅग्स :MahabeejमहाबीजFarmerशेतकरीwashimवाशिम