वाकुडकरांच्या ‘सखे साजणी’ने वाशिमकरांना केले मंत्रमुग्ध

By Admin | Updated: December 29, 2014 00:33 IST2014-12-29T00:33:38+5:302014-12-29T00:33:38+5:30

‘बाबा जहर खाउ नका’ या शेतकरी आत्महत्या रोखणार्‍या गीताचे सादरीकरण.

Wakamdukar's 'Sakhani Saajan' has made the spellbound performer for Washimkar | वाकुडकरांच्या ‘सखे साजणी’ने वाशिमकरांना केले मंत्रमुग्ध

वाकुडकरांच्या ‘सखे साजणी’ने वाशिमकरांना केले मंत्रमुग्ध

वाशिम : स्थानिक एस.एम.सी. स्कुल कॅम्पसच्या प्रांगणात सुप्रसिद्ध कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांच्या सखे साजणी हा विनोदी, सामाजिक व शृंगारिक बहारदार कार्यक्रम २५ डिसेंबर रोजी झाला. या कार्यक्रमात प्रा. वाकुडकर यांनी मनाची विविध स्पंदने जागविणार्‍या एकाहून एक सरस कविता सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे उद्घाटन बालरोग तज्ञ डॉ. हरिष बाहेती यांनी केले तर अध्यक्षस्थानी एस.एम.सी. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. हरिभाउ क्षिरसागर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. सुधीर कवर, जि.प. सभापती चक्रधर गोटे, जिल्हा कारागृह अधिक्षक चांदणे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात ह्यबाबा जहर खाउ नकाह्ण या शेतकरी आत्महत्या रोखणार्‍या गीतांचे प्रा. हरिभाउ क्षिगसागर यांच्या हस्ते लोकार्पण केल्यानंतर झाली. या कार्यक्रमात ह्यतुझ्या टपोर्‍या डोळय़ात माझं इवलंस गाव, मला येवू दे ना आई, सरपंच झाल्या बायका, ये म्हटले की, वाकुडकरांची नथ,ह्ण या गीताने मैफलीत रंग आणला. सखे साजणीने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

Web Title: Wakamdukar's 'Sakhani Saajan' has made the spellbound performer for Washimkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.