शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

मानोरा तालुक्यात सौभाग्य योजनेची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 3:15 PM

मानोरा (वाशिम) : दारिद्र्यरेषेखालील तसेच गोरगरीब कुटुंबाच्या घरी वीजजोडणी देण्यासाठी सौभाग्य योजना राबविली जात आहे. मानोरा तालुक्यातील पोहरादेवी व दापुरा या दोन उपकेंद्रांच्या अपवाद वगळता उर्वरीत कुटुंबांना अद्याप वीजजोडणी मिळाली नाही.

-  बबन देशमुखमानोरा (वाशिम) : दारिद्र्यरेषेखालील तसेच गोरगरीब कुटुंबाच्या घरी वीजजोडणी देण्यासाठी सौभाग्य योजना राबविली जात आहे. मानोरा तालुक्यातील पोहरादेवी व दापुरा या दोन उपकेंद्रांच्या अपवाद वगळता उर्वरीत कुटुंबांना अद्याप वीजजोडणी मिळाली नाही.केंद्र शासनाने ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना, सौभाग्य’ या नावाने सन २०१७ मध्ये ही योजना कार्यान्वीत केली. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील गोरगरीब कुटूंबाच्या घरी मोफत वीज जोडणी केली जाणार आहे. विज जोडणी नसणाºया  ग्राहकांनी या योजनेचा फायदा  घ्यावा, यासाठी  मानोरा तालुक्यात जनजागृतीही करण्यात आली.   तथापि, तालुक्यातील ७७ गावे या योजनेपासुन अद्याप वंचित असल्याचे समोर आले आहे. मानोरा  पंचायत समितीच्या माध्यमातुन ग्राम पंचायतींनी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे ७ फेबुवारी २०१८ रोजी वीजजोडणी नसणाºया  घरांची यादी   पाठविली. आता एक वर्षाचा कालावधी उलटत आहे. परंतू, अद्याप या कुटुंबांना वीजजोडणी मिळाली नाही. यामध्ये अभईखेडा येथील ४७ कुटुंब याप्रमाणे आमदरी येथील १६, आमकिन्ही ४७, आमगव्हाण ४३, आसोला ३१, आसोला खु २८३, अजनी २७, भिलडोंगर ११०, भोयणी २७, भुली १२४, बोरव्हा ९५, चौसाळा ५४, चोंडी ७९, दापुरा बु. १७, दापुरा खु. १८, देऊरवाडी ७४, देवठत्तणा ३४,  धानोरा ६५, ढोणी ५८, धावंडा १८, इंझोरी २१, एकलारा ७६, फुलउमरी ८३,  गादेगाव ३४५, गव्हा ६६, गिर्डा १४, गिरोली ९०, गोंडेगाव ३५, हळदा ५६, हातना ३१, हातोली १३, कारपा १८०, खांबाळा १०२, कोलार ५५, कुपटा, ३, माहुली ४५, म्हसनी ३७, मोहगव्हाण ८७, पंचाळा ११८, पाळोदी ६१, पारवा ३६, पोहरादेवी ८१६, रतनवाडी १३२ , रोहणा १०२ , रुद्राळा ४६, सावळी २३, सेवादासनगर ६२, शेंदोना १६५, शेंदुरजना १०९, सोयजना १३४, सोमनाथनगर १४३, सोमठाणा ५०, तोरणाळा ३०, उमरी बु. १२१, वापटा २०३, वसंतनगर, ५०, वटफळ १८५, विठोली १०८, वाईगौळ १४९, अशी गावनिहाय कुटुंब संख्या आहे. मानोरा तालुक्यातुन शेकडो विज जोडणीची मागणी असताना, अद्याप महावितरणकडून कोणतीही कार्यवाही नसल्याने गोरगरीब कुटुंबांमधून रोष व्यक्त होत आहे. तालुक्यातील पोहरादेवी व दापुरा या दोन उपकेंद्रांच्या अपवाद वगळता उर्वरीत गावांना सौभाग्य योजनेंतर्गतच्या वीजजोडणीची प्रतिक्षाच आहे. 

सौभाग्य योजने अंतर्गत मानोरा तालुक्यातील पोहरादेवी, दापुरा या दोन सेंटरमधील काही गावामध्ये वीज जोडणी नसणाºया घरांमध्ये विजजोडणी केली आहे. उर्वरीत गावांमध्ये वीजजोडणी केल्या जाईल.- विलास वाघउपकार्यकारी अभियंता,महावितरण, मानोरा

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराmahavitaranमहावितरण