दुष्काळी मदतीबाबत शासनाच्या निर्देशांची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 16:37 IST2018-03-17T16:37:34+5:302018-03-17T16:37:34+5:30

वाशिम : जिल्ह्यातील ७९३ गावांची पीक पैसेवारी यंदा ४७ पैसे असल्याने शासनस्तरावरून दुष्काळ जाहीर होऊन त्यानुषंगाने पुरविल्या जाणाºया सुविधा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Waiting for government's instructions on drought relief! | दुष्काळी मदतीबाबत शासनाच्या निर्देशांची प्रतीक्षा!

दुष्काळी मदतीबाबत शासनाच्या निर्देशांची प्रतीक्षा!

ठळक मुद्देजिल्ह्यातील ७९३ गावांची पीक पैसेवारी यंदा ४७ पैसे असल्याने शासनस्तरावरून दुष्काळ जाहीर.दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही याबाबत शासनस्तरावरून प्रशासनाला कुठलेच निर्देश मिळालेले नाहीत.

वाशिम : जिल्ह्यातील ७९३ गावांची पीक पैसेवारी यंदा ४७ पैसे असल्याने शासनस्तरावरून दुष्काळ जाहीर होऊन त्यानुषंगाने पुरविल्या जाणाºया सुविधा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, पैसेवारी जाहीर होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही याबाबत शासनस्तरावरून प्रशासनाला कुठलेच निर्देश मिळालेले नाहीत. त्यामुळे हा प्रश्न अधांतरी असल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली. 
वाशिम जिल्ह्यात अधिकांश शेती क्षेत्र हे कोरडवाहू असून सिंचनाची प्रभावी सुविधा नसल्याने शेतकºयांना पावसाच्या पाण्यावर तथा पारंपरिक पिकांवरच विसंबून राहावे लागते. अशातच गेल्या दोन ते तीन वर्षापासून जिल्ह्याच्या सरासरी पर्जन्यमानात घट झाली.  याशिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे, उद्भवलेल्या विविध स्वरूपातील नैसर्गिक संकटांमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. यादरम्यान जानेवारी महिन्यात जिल्हा प्रशासनाकडून अंतीम पीक पैसेवारी जाहीर झाली. त्यात ७९३ महसूली गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत अर्थात ४७ पैसे जाहीर झाल्याने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर होऊन त्यानुषंगाने पुरविल्या जाणाºया सुविधा लागू होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, शासनस्तरावरून याबाबत अद्याप कुठलेच निर्देश नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Waiting for government's instructions on drought relief!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.