कोंडवाडे दुरुस्तीसाठी निधीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:37 IST2021-08-01T04:37:54+5:302021-08-01T04:37:54+5:30
०००००००० संरक्षण भिंतीसाठी निधीची मागणी वाशिम : नदीकाठावरील गावालगत पूरसंरक्षण भिंत उभारण्यासाठी शासनाकडून निधी मिळावा, अशी मागणी वारंवार ...

कोंडवाडे दुरुस्तीसाठी निधीची प्रतीक्षा
००००००००
संरक्षण भिंतीसाठी निधीची मागणी
वाशिम : नदीकाठावरील गावालगत पूरसंरक्षण भिंत उभारण्यासाठी शासनाकडून निधी मिळावा, अशी मागणी वारंवार करण्यात आली. अद्यापही निधी मिळाला नाही. पूरसंरक्षण भिंतीसाठी शासनाने निधी द्यावा, अशी मागणी माजी जि.प. सदस्य चरण गोटे यांनी शुक्रवारी केली.
००००००००
प्रोत्साहन अनुदान केव्हा मिळणार?
वाशिम : नियमित कर्जफेड करणाऱ्या वाशिम तालुक्यातील कार्ली परिसरातील शेतकऱ्यांना शासनाने प्रोत्साहन अनुदान अद्याप दिले नाही. प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी शुक्रवारी केली.
०००००
कर्जाच्या हप्त्यांना स्थगिती द्या
वाशिम : कोरोनामुळे वर्षभरापासून सर्वच व्यवसाय प्रभावित झाले आहेत. अशा स्थितीत बँका व मायक्रो फायनान्सकडून सक्तीने वसुली सुरू असून, त्यास किमान काही महिने स्थगिती द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे वाशिम तालुकाध्यक्ष महादेवराव सोळंके यांनी शुक्रवारी केली.