‘केमोथेरपी’च्या सुविधेची प्रतीक्षा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:36 IST2021-04-05T04:36:46+5:302021-04-05T04:36:46+5:30
.................... आवक घटल्याने भाजीपाला महागला रिसोड : आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर वाढल्याचे ४ एप्रिल रोजी रिसोड येथील भाजीबाजारात दिसून ...

‘केमोथेरपी’च्या सुविधेची प्रतीक्षा कायम
....................
आवक घटल्याने भाजीपाला महागला
रिसोड : आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर वाढल्याचे ४ एप्रिल रोजी रिसोड येथील भाजीबाजारात दिसून आले. पूर्वी २० रुपये किलो असलेली वांगी आता ४० रुपये किलो, भेंडी ४० रुपयावरून ६० रुपये किलो या दराने विकत घ्यावी लागत आहे.
...............
कृषी प्रशिक्षण आराखडा
वाशिम : खरीप हंगाम जवळ येत असून, पीक उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांपर्यंत तांत्रिक मार्गदर्शन पोहचविण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभागाने कृषी सखी व उमेद अभियानात सहभागी महिलांना कृषीविषयक प्रशिक्षण देण्याचा गावनिहाय कृती आराखडा तयार केला.
...................
दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी
वाशिम : येथील दुय्यम निबंधक कार्यालयात शेती, प्लॉट खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे.
...........................
बिजोत्पादनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वाशिम : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन सभांचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत कृषी सहाय्यकांनी रविवारी तालुक्यात बिजोत्पादनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.