शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा तालुक्यात मतदान प्रक्रिया शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:45 IST

मानोरा : तालुक्यातील २२ पैकी २१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी ७.३० वाजल्यापासून सायंकाळी ५.३० ...

मानोरा : तालुक्यातील २२ पैकी २१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी ७.३० वाजल्यापासून सायंकाळी ५.३० पर्यंत पार पडलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान युवक आणि दिव्यांगांसह वयोवृद्धांचाही मतदान प्रक्रियेत उत्साह दिसून आला. प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार वृत्त लिहिस्तोवर मतदानाची टक्केवारी ५८.१४ होती.

तालुक्यातील कारखेडा, विठोली,वाई गौळ, गादेगाव, अजनी, गव्हा, तळप बुद्रुक, कोंडोली, आसोला, पारवा, सेवादास नगर, हिवरा बु, धामणी, शेंदुरजना आढाव, इंझोरी, गोंडेगाव, मोहगव्हाण, या गावांतील ग्रामपंचायतींचा कार्यकाळ गतवर्षी जून-जुलै महिन्यांत संपला होता. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थगित करून प्रशासकांची नियुक्त प्रशासनाकडून करण्यात आली होती. दरम्यान, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यात मानोरा तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींपैकी एक ग्रामपंचायत अविरोध झाली, तर उर्वरित २१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान घेण्यात आले. मानोरा तालुक्यात निर्धारित वेळेनुसार सकाळी सात वाजून ३० मिनिटांनी प्रत्येक मतदान केंद्रावर प्रशासनाच्या चोख बंदोबस्तात शांततेत मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली.

वृत्त लिहिस्तोवर ................................... टक्के मतदानाची नोंद झाली होती.

------------

पोलिसांचा चोख बंदोबस्त

तालुक्यात २१ ग्रामपंचायतीची निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या आदेशानुसार ठाणेदार शिशिर मानकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यात पोलीस कर्मचाऱ्यांसह प्रत्येक केंद्रावर होमगार्डची नियुक्ती करण्यात आली होती. शिवाय भरारी पथकाने प्रत्येक मतदान केंद्राला भेटी देऊन मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला.