शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

ऐच्छिक रक्तदानाचा टक्का वाढतोय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 16:00 IST

वाशिम : रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून, यासाठी युवक सरसावले असल्याचे आशादायी चित्र समोर येत आहे. रक्ताची अशी नाती जोडण्यासाठी ऐच्छिक रक्तदात्यांचा ‘टक्का’ वाढत आहे. रा

वाशिम : रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून, यासाठी युवक सरसावले असल्याचे आशादायी चित्र समोर येत आहे. रक्ताची अशी नाती जोडण्यासाठी ऐच्छिक रक्तदात्यांचा ‘टक्का’ वाढत आहे. राज्यात २०१० मध्ये रक्तसंकलनाचे १०.८६ लाख यूनिटचे प्रमाण २०१८-१९ मध्ये १९ लाख यूनिटवर गेले आहे.रक्ताचा एक थेंब एखाद्याचे प्राण वाचविण्यास पुरेसा ठरू शकतो. रक्तदानासंदर्भात व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात असल्याने रक्तदान मोहिमेला चळवळीचे स्वरुप प्राप्त होत आहे. एखाद्याला जीवदान देण्यासाठी आता सर्व वयोगटातील नागरिक समोर येत असल्याने साहजिकच रक्तपेढीतील ऐच्छिक रक्तसंकलनात वाढ होत आहे. राज्यात २०१० मध्ये २७३ रक्तपेढीतून १०.८६ लाख युनिट ऐच्छिक रक्तसंकलन झाले होते. १०.८६ लाख युनिट म्हणजे १०.८६ लाख बॅग. अर्थात रक्तदातेही १०.८६ लाख! २०११ मध्ये २८२ रक्तपेढ्यांतून ११.९२ लाख युनिट, २०१२ मध्ये २९१ रक्तपेढ्यांतून १३.२९ लाख युनिट, २०१३ मध्ये ३०० रक्तपेढ्यांतून १३.९० लाख युनिट आणि २०१४ मध्ये ३१० रक्तपेढ्यांतून १४.९२ लाख युनिट रक्तसंकलन झाल्याची नोंद राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या दप्तरी आहे. सन २०१६-१७ मध्ये ३२१ रक्तपेढ्यातून १६.१७ लाख युनिट, सन २०१७-१८ मध्ये ३३१ रक्तपेढ्यातून १७ लाख तर २०१८-१९ मध्ये १८ लाख युनिट रक्तसंकलन करण्यात आले. यामध्ये ऐच्छिक रक्तसंकलनाची टक्केवारी ९० पेक्षा अधिक आहे.वाशिम जिल्ह्याचा विचार करता सन २०१० मध्ये ३००, २०११ मध्ये ६३१, २०१२ मध्ये १२६५, २०१३ मध्ये १०८०, २०१४ मध्ये २१३७, २०१५ मध्ये २२४७, २०१६ मध्ये २१७१, २०१७ मध्ये २०२५, २०१८ मध्ये २८४८ आणि जानेवारी २०१९ ते ३० मार्च २०१९ या दरम्यान ६१० रक्तदात्यांनी रक्तदान केले.  वाशिम जिल्ह्यात रक्तदानासंदर्भात आरोग्य विभागातर्फे व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात आहे. यामुळे रक्तदान मोहिमेला लोकचळवळीचे स्वरुप येत आहे. युवावर्ग मोठ्या संख्येने ऐच्छिक रक्तदानाकडे वळत आहे. सर्वसामान्य जनतेलादेखील रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले जात आहे.- डॉ. अनिल कावरखेप्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम.

टॅग्स :washimवाशिमBlood Bankरक्तपेढी