प्रचार कार्यात व्यक्ती संख्या मर्यादेचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:45 IST2021-01-13T05:45:05+5:302021-01-13T05:45:05+5:30
येत्या १५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागाची तयारी ...

प्रचार कार्यात व्यक्ती संख्या मर्यादेचे उल्लंघन
येत्या १५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रांची साफसफाई करून तेथे विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत, तर प्रचारासाठी अवघे दोन दिवस हाती असल्याने उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे. तथापि, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रचारासाठी नियम घालून दिले आहेत. त्यात उमेदवारांना पाचपेक्षा अधिक व्यक्तींसोबत घेऊन प्रचार करण्यास मनाई असून, प्रचारात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करताना मास्कचा वापरही करणे आवश्यक आहे. तथापि, बहुतांश ग्रामपंचायतींत या नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत असून, काही गावांत पाचपेक्षा अधिक व्यक्ती उमेदवारांसह घरोघर फिरून मतदारांशी चर्चा करीत प्रचार करीत असल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले.
----------
पिंपळगाव
पिंपळगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात उमेदवार नियमांचे पालन करीत नाहीत. तोंडाला मास्क आणि फिजिकल डिस्टन्सही राखले जात नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाला वाव आहे.
----------
मोप
मोप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रचारकार्याला वेग आला असताना काही उमेदवार आपल्या १० समर्थकांसह घरोघर भेटी देत असल्याचे चित्र दिसले. त्यातून कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे.
-------
सार्सी बोथ
ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात विविध प्रभागांत उभे असलेले उमेदवार पॅनलमधील सहकाऱ्यांसह घरोघर भेटी देऊन प्रचार करताना दिसून येत आहेत. सोमवारीसुद्धा हा प्रकार पाहायला मिळाला.
-------------
ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचारासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन उमेदवारांकडून केले जात असल्याची खात्री आहे. यावर देखरेखीच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. आजवर कोणत्याच ग्रामपंचायतीमधून नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार प्राप्त झाली नाही. तथापि, पडताळणी केली जाईल.
- सुनील विंचनकर,
जिल्हा निवडणूक अधिकारी