शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन; दुकानदारांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 10:29 IST

Washim News : १० दुकाने सील करून दुकानदारांकडून ३० हजाराचा दंड वसूल केला.

कारंजा (लाड) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांवर निर्बंध लावले आहेत. तरीही शहरातील काही व्यापाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन दुकाने उघडून विक्री सुरू ठेवल्यामुळे ८ मे रोजी १० दुकाने सील करून दुकानदारांकडून ३० हजाराचा दंड वसूल केला.अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सर्रास खरेदी-विक्री चालू आहे, ही गंभीर बाब असून याचे पालन होत नसल्याने मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी दुकानांवर कारवाई केली आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध जाहीर केले आहे. मेडिकल दुकानाव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची दुकाने उघडण्यास मनाई करण्यात आली आहे. तर संचारबंदी आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनावर टाकली आहे. कारंजा नगरपालिकेचे पथक शनिवारी सकाळी ७ ते ११ या वेळेत बाजारपेठेत पाहणी करून कारवाई करण्यासाठी फिरत होते. त्यावेळी नगरपालिका पथकाला बाजारपेठेतील काही दुकाने उघडलेली आढळून आली. तसेच शटर लावून ग्राहकांना आत घेऊन विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी या दुकानदारांवर कारवाई केली. दरम्यान, एकीकडे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात काही दुकानदार हे दुकाने उघडून माल विकत आहे. याला लगाम बसण्यासाठी  धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच दरम्यान १० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच कारवाई करून दुकाने सील करण्यात आली आहेत. मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर, विनय वानखडे, राहुल सावंत, सुधीर चौकोर, रवी जयदे, विजय सावंते आदींनी कारवाई केली.

कारवाईची मोहिम तीव्र करणारकारंजा शहरात यापूर्वीदेखील संचारबंदी असताना दुकाने उघडी असल्याचे आढळून आल्याने संबंधित दुकानदारांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्याऊपरही काही दुकानदार हे चोरून, लपून व्यवसाय करीत असल्याची माहिती नगर परिषदेच्या पथकाला मिळाली हाेती. या माहिती पडताळणी म्हणून पथकाने पाहणी केली असता शनिवारी दुकानांचे अर्धे शटर उघडे आढळून आले तसेच दुकानात व्यवहार सुरू असल्याचे निदर्शनात आल्याने कारवाई करण्यात आली. दुकानदारांनी संचारबंदी नियमाचे पालन करावे, असे आवाहन करतानाच यापुढेही कारवाईची मोहिम तीव्र करणार असल्याचे मुख्याधिकारी डोल्हारकर यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा