राजुरा परिसरातील गावे निर्मनुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:40 IST2021-05-10T04:40:57+5:302021-05-10T04:40:57+5:30

संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी राजुरासह परिसरातील बहुतांश गावांमध्ये लघुव्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवल्याचे चित्र दिसून आले. एरव्ही गर्दीने गजबजणारे गावागावातील ...

Villages in Rajura area are deserted | राजुरा परिसरातील गावे निर्मनुष्य

राजुरा परिसरातील गावे निर्मनुष्य

संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी राजुरासह परिसरातील बहुतांश गावांमध्ये लघुव्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवल्याचे चित्र दिसून आले. एरव्ही गर्दीने गजबजणारे गावागावातील रस्तेही निर्मनुष्य झाल्याचे पाहावयास मिळाले. राजुरासह नजीकच्या खैरखेडा, सुकांडा या गावांमधील लघुव्यावसायिकांनी दुकाने पूर्णत: बंद ठेवली. गावातील पारावर, चौकांमध्ये तासन्‌तास ठिय्या मांडून बसणारी युवा तथा वृद्धमंडळींनी कारवाईच्या भीतीने स्वतःला चार भिंतीच्या आत कोंडून घेतल्याने सकाळपासूनच बहुतेक रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र दिसून आले.

कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारणास्तव घराबाहेर पडण्यास पुढील सात दिवस मनाई राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून ग्रामस्थांनी आपापल्यापरीने सात दिवस पुरेल एवढे संसारोपयोगी साहित्य खरेदी करून ठेवले. यामुळे ८ मे व ९ च्या सकाळी काही ठिकाणी गर्दी झाली होती.

Web Title: Villages in Rajura area are deserted