विजेच्या लपंडावामुळे ग्रामस्थ त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:30 IST2021-06-02T04:30:43+5:302021-06-02T04:30:43+5:30

येथील विद्युत पुरवठा गत दोन दिवसांपासून चालूबंद हाेेत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ग्रामीण भागातील जनता घरीच आहे. उन्हाळा ...

Villagers suffer due to power outage | विजेच्या लपंडावामुळे ग्रामस्थ त्रस्त

विजेच्या लपंडावामुळे ग्रामस्थ त्रस्त

येथील विद्युत पुरवठा गत दोन दिवसांपासून चालूबंद हाेेत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ग्रामीण भागातील जनता घरीच आहे. उन्हाळा असल्याने चांगलेच तापत असल्याने उकाड्याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. विद्युत उपकरणे केवळ शाेभेची वस्तू बनल्या आहेत. तसेच मंगरुळपीर येथून ग्रामीण कृषीची लाइन कोठारी-दाभा फाट्यावर एक पोल तुटल्यामुळे बंद आहे. यामुळे दाेन दिवसांपासून ग्रामस्थ, शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत कोठारी येथील लाइनमन शेख राज्जीक यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी गत आठवड्यात विद्युत शाॅक लागल्यामुळे मी सध्या रजेवर असल्याचे सांगितले. कोठारी-दाभा फाट्यावर पोल तुटल्यामुळे तार तुटल्या आहेत व आज काम चालू असून सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल, असेही सांगितले.

Web Title: Villagers suffer due to power outage