शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

जलस्त्रोतांच्या पुनरुज्जीवनासाठी ग्रामस्थांची धडपड  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 2:51 PM

कारंजा तालुक्यात बहुतांश गावात हे चित्र पाहायला मिळत असून, विविध प्रशासकीय विभागाकडून सुरू असलेल्या  कामांना ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.

- प्रफुल बाणगावकर  कारंजा लाड (वाशिम) :  पाणीटंचाईच्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना आता जलसंधारणाचे महत्त्व कळू लागले आहे. त्यामुळेच अस्तित्वात असलेल्या जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी त्यांची मोठी धडपड सुरू आहे. कारंजा तालुक्यात बहुतांश गावात हे चित्र पाहायला मिळत असून, विविध प्रशासकीय विभागाकडून सुरू असलेल्या  कामांना ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.कारंजा तालुक्यातील अनेक गावांत दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू होते. त्यामुळे रोजगारांवर परिणाम होतोच शिवाय इतर कामांतही अडचणी निर्माण होतात. पाण्याअभावी गुरांचे पोषण करणे कठीण जाते. वणवण करूनही घशाची कोरड मिटविण्याइतपत पाणी मिळत नसल्याचे वास्तवही काही गावांत आहे. अशाच गावातील पाणीटंचाई मिटविण्यासाठी राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातून कृषी विभाग, जि.प. लघू सिंचन विभाग, पाटबंधारे विभाग आणि जलसंपदा विभागाच्यावतीने नाला खोलीकरण, शेततळे, ढाळीचे बांध, सिमेंट नाला बांध, नदी खोलीकरण, तलाव खोलीकरणाची कामे करण्यात येत आहेत. यामुळे गावातील पाण्याची समस्या मिटण्यास मोठी मदत होणार असल्याने गावकरी या कामांसाठी प्रशासकीय विभागांना सहकार्य करत असल्याचे चित्र कारंजा तालुक्यात दिसूत असून, यामुळेच कारंजा तालुक्यात मोखड पिंप्री, हिंगणवाडीसह विविध गावांत जलस्त्रोतांच्या पुनरुज्जीवनाची कामे वेगात करण्यात येत असून, त्याचा फायदाही ग्रामस्थांसह शेतकºयांना होत आहे.    जलसंधारण विभागाची धडपड  पावसाळा सुरू झाला असून, ठिकठिकाणी जोरदार पाऊसही पडत आहे. यामुळे जलस्त्रोतांच्या खोलीकरणात अडथळे निर्माण होत आहेत. पुढे पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर ही कामे करणे अशक्य होणार आहे. त्यामुळे जलसंधारण विभाग त्यांच्या अखत्यारीत असलेली कामे पूर्ण करण्यासाठी मोठी धडपड करीत आहे. हिंगणवाडी ते रामटेक या नदीचे खोलीकरणही तातडीने पूर्ण व्हावे म्हणून जलसंधारण विभागाचे अधिकारी शक्य ते प्रयत्न करीत असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे.  हिंगणवाडी येथे नदी खोलीकरणभारतीय जैन संघटना व जलसंधारण विभागांच्या वतीने येथे सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत कारंजा तालुक्यातील ग्राम रामटेक ते हिंगणवाडी राहटी नदीच्या खोलीकरणास १९ जुन पासून सुरवात झाली आहे. नदी खोलीकरणाच्या कामात हिंगणवाडी व राहटी तसेच रामटेक येथील शेतकरी वर्गासह ग्रामस्थांचे मोठया प्रमाणात सहकार्य मिळत जल संधारण विभागाला लाभत आहे. त्यामुळे ही नदी वेगाने गतवैभव प्राप्त करीत असल्याचे दिसते.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा